बसस्थानकांवर चढ्या दराने नाश्ता . पाणी विक्री केल्यास कारवाई
बसस्थानकांवर चढ्या दराने नाश्ता . पाणी विक्री केल्यास कारवाई
कणकवली-प्रतिनिधी
राज्य परिवहन विभागाच्या अधिकृत खासगी थांब्यांवर ३० रुपयांमध्ये चहा, नाश्ता योजनेची अंमलबाजवणी होत नसल्याच्या तसेच बसस्थानकांमधील परवानाधारक नाथजल वितरक हे छापील किमतीपेक्षा अधिक दरामध्ये पाणीबाटल्यांची विक्री करीत असल्याच्या तक्रारी विविध माध्यमांमधून राज्य परिवहन विभागाकडे प्राप्त होत आहेत. याबाबत नियोजन व पणन विभागाचे महाव्यवस्थापक यांच्यातर्फे विभाग नियंत्रकांना सूचनापत्र पाठविण्यात आले आहे.
जादा दराने पाणीबाटली विक्री केली जात असल्यास याबाबत खातरजमा करण्याची जबाबदारी वाहतूक पर्यवेक्षकांची राहील कारवाईत हयगयपणा केल्यास वाहतूक पर्यवेक्षक व आगार व्यवस्थापक यांची जबाबदारी निश्चित करण्याची कार्यवाही
करण्यात यावी. तसेच ३० रुपयामध्ये च नाश्ता मिळण्याबाबत मार्गतपास अधिकारी, वाणिज्य आस्थापना पर्यवेक्षक विभागातील अधिकाऱ्यांनी प्रवास करत नियमीतपणे तपासणी करावी. योजन अंमलबाजावणी होत नसल्यास याबा सदर बांबा ज्यांच्या अखत्यारित येतो. विभाग नियंत्रकांना लेखी अहवाल स करावा, असे पत्रात म्हटले आहे.
३० रुपयांमध्ये चहा, नाश्ता देणे बंधनकारक चहा, नाश्ता योजनेत अधिकृत ह मालकाने प्रवाशांना ३० रुपयांमध्ये नाश्ता देणे बंधनकारक आहे. असे असत प्रवाशांच्या हिताविषयी असलेल्या योज अंमलबजावणी स्थानिक विव आगारामार्फत करण्यात येत नाही, त याबाबत कार्यवाही न करणाऱ्या रा. पर्यवेक्षक, अधिकाऱ्यांवर कारवाई होत न ही खेदाची बाब असल्याचेही म्हटले आहे

