कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

दिल दोस्ती ग्रुप सिंधुदुर्ग या संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

दिल दोस्ती ग्रुप सिंधुदुर्ग या संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

दिल दोस्ती ग्रुप सिंधुदुर्ग या संस्थेच्या वतीने ,शनिवार दिनांक २७/०५/२०२३ रोजी ,संस्थेचे अध्यक्ष श्री.शेखरजी डोईफोडे यांच्या निवास्थानी, शैक्षणिक वर्ष २०२३ मध्ये घेतलेल्या १३ विद्यार्थ्यांना व २०२४ मध्ये १ विद्यार्थ्याला ,माझी जिल्हा परिषद सदस्य मा.श्री .मायकल डिसोजा यांच्या शुभहस्ते शैक्षणिक साहित्य देण्यात आले .
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.शेखरजी डोईफोडे,उपाध्यक्ष .श्री राजेश जानकर,सचिव श्री बळिराम कोकरे,खजिनदार श्री दिपक ताटे,श्री महादेव खरात, होते.यावेळी मनोगत व्यक्त करतांना संस्थेच्या कार्याचे श्री मायकल डिसोजा यांनी कौतुक केले व पुढच्या वर्षी संस्थेचे ५ विद्यार्थी दत्तक म्हणून पालकत्व स्विकारले यावेळी श्री महादेव खरात यांनी मनोगत व्यक्त केले .कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री राजु ताटे,श्री विनायक जंगले ,श्री संजय शिंदे,श्री विनोद कोळेकर,श्री लकी डोईफोडे,श्री लक्ष्मण पाटील,श्री प्रमोद यादव यांनी विशेष परीश्रम घेतले .प्रास्ताविक, श्री राजु ताटे ,सुञसंचलन श्री रमेश शिंदे व आभार श्री विनायक जंगले यानी मानले .यावेळी कारीवडे ग्रामस्थ,पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!