🟥 डी. जी. बांदेकर ट्रस्ट, आणि बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट यांच्या वतीने विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यकालीन करिअरसाठी उपयुक्त असा ‘फाऊंडेशन कोर्स’ संपन्न..
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी,दि-२७:-* डी. जी. बांदेकर ट्रस्ट, सावंतवाडी आणि बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट सावंतवाडी या महाविद्यालयातर्फे कलेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यकालीन करिअरसाठी उपयुक्त असा ‘फाऊंडेशन कोर्स’ यावर्षी प्रथमच सावंतवाडीत सुरू करण्यात आला आहे. या कोर्सच्या प्रवेश प्रक्रियेचा शुभारंभ आज आर्ट टिचर युनियन महाराष्ट्र व्हा. प्रेसिडेंट बाळाराम सामंत, आर्ट टिचर युनियन सिंधुदुर्ग प्रेसिडेंट रूपेश नेवगी, डी. जी. बांदेकर ट्रस्टचे चेअरमन गोविंद बांदेकर, सचिव अनुराधा बांदेकर-परब यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
सिंधुदुर्गातील एकमेव कलेची पदवी देणारे महाविद्यालय म्हणून २५ वर्ष या क्षेत्रात हे महाविद्यालय आपला ठसा उमटवून आहे. गेली आजपर्यंत ६५० विद्यार्थी या महाविद्यालयातून उपयोजित कलेची पदवी घेऊन मोठ्या शहरात तसेच विदेशात आपले व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव मानाने मिरवत आहेत.
या क्षेत्राकडे वळताना सीईटी परीक्षेविषयी पूर्व कल्पना व तयारी होण्याच्या दृष्टीने हा एक वर्षाचा फाऊंडेशन कोर्स खूप उपयुक्त ठरणार आहे. बदलत्या शिक्षण प्रकाराबरोबर नवनवीन तंत्रज्ञान आणि कल्पना या गोष्टींकडे पाहता सॉफ्टवेअर, आर्ट, क्राफ्ट, मॉडेलिंग, अॅनिमेशन अशा गोष्टी या कोर्समध्ये विद्यार्थ्याना शिकता येणार आहेत. तर मुख्यत्वे करून या कोर्स करिता कोणत्याही सीईटी परीक्षेची अट नसल्याने केवळ १० वी व १२ वी इयता पूर्ण केलेला विद्यार्थी सहजपणे या कोर्ससाठी प्रवेश घेऊ शकतो. येत्या जून महिन्यापासून या फाऊंडेशन कोर्स ची सुरुवात होणार असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या कला क्षेत्राकडे वळून आपले योग्य करिअर निवडावे असे आवाहन डी. जी. बांदेकर ट्रस्टच्या सचिव
अनुराधा परब-बांदेकर यांनी केले आहे. तर डी. जी. बांदेकर या कौटुंबिक ट्रस्टची स्थापना करण्यात आली असून फाउंडेशन कोर्स हा पहिला उपक्रम संस्थेचा आहे. भविष्यात विविध क्षेत्रातील उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, कलेला पूरक असे वातावरण असणाऱ्या सावंतवाडीत बरेच मोठमोठे कलाकार होऊन गेले आणि आजही नवनवीन कलाकार घडत आहेत. कलेची आवड असणाऱ्या पाल्याच्या १० वी नंतर किंवा १२ वी नंतर या कोर्स साठी प्रवेश घेता येणार आहे. या कोर्सच्या अधिक माहितीसाठी तुकाराम मोरजकर ९४०५८३०२८८ व सिद्धेश नेरुरकर ९४२०२६०९०३ यांना संपर्क साधावा असे आवाहन संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. याप्रसंगी यावेळी आर्ट टिचर युनियन महाराष्ट्र व्हा. प्रेसिडेंट बाळाराम सामंत, आर्ट टिचर युनियन सिंधुदुर्ग प्रेसिडेंट रूपेश नेवगी, डी. जी. बांदेकर ट्रस्टचे चेअरमन गोविंद बांदेकर, सचिव अनुराधा बांदेकर- परब, प्र. प्राचार्य तुकाराम मोरजकर, अँड. क्षितीज परब आदी उपस्थित होते.
*_………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
_आपल्या अडचणीच्या जागेत बोअरवेल 💧खोदायची आहे त्यासाठी एकमेव पर्याय *💦”श्रीराम बोअरवेल्स”💦*_
*🚰श्रीराम बोअरवेल्स-सावंतवाडी💧*
*🛑आमची वैशिष्ट्ये:-*
◾आमच्याकडे अडचणीच्या ठिकाणी 300 फूट लांब गाडी उभी करून, मोठे होल ६” (इंच) बोअरवेल 500 फुटापर्यंत खुदाई करून मिळेल…!💦
◾आमचेकडे 3D जर्मन इलेक्ट्रॉनिक मशीन द्वारे 1500 फुटापर्यंत बोअरवेल व विहिरीचा पॉईंट सर्वे करून मिळेल…!💦
◾आम्ही इलेक्ट्रॉनिक मशीनने सर्वे केलेल्या बोअरवेल पॉईंटला पर डे (प्रत्येक दिवशी) कमीत कमी 3000 ते 5000 लिटर पाण्याची 100% गॅरन्टी (हमी) दिली जाते…!💦
◾तसेच ग्राहकांनी आमच्याकडून बोअरवेलसाठी पाणी सर्वे व बोअरवेल मारून घेतल्यास बोअरवेलला पाणी न लागल्यास नियम व अटी नुसार 100 % रक्कम 90 दिवसांनी परत दिली जाईल…!💦
◾बोअरवेल पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण पेमेंट भरून घेतले जाईल व आमच्या ॲग्रीमेंट पेपरवरती आपली सही घेतली जाईल…!💦
◾आमचेकडे बोअरवेल खुदाई व पंपसेट दोन्ही आमच्याकडून करून घेतल्यास संपूर्ण 24 महिने पाण्याची गॅरंटी दिली जाईल. व 24 महिने बोअरवेलला पाणी कमी झाल्यास संपूर्ण पेमेंट परत दिले जाईल किंवा त्या बदल्यात मोफत दुसरी नवीन बोअरवेल खुदाई करून मिळेल, ही ग्राहकांनी नोंद घ्यावी…!💦
◾आमचेकडे पंपसेटला 2 वर्ष (24 महिने) गॅरंटी दिली जाते व 1 वर्ष फ्री-सर्वीस दिली जाते व त्यानंतर सर्विस चार्ज घेतला जातो तसेच पंपसेट 2 वर्षापर्यंत खराब झाल्यास दुसरा नवीन पंपसेट पहिल्या गॅरंटी मध्ये फिटिंग करून दिला जातो व फक्त सर्विस चार्ज रुपये 1000/- घेतले जाईल…!💦
◾आमचेकडून पंपसेट फिटिंग करून घेतल्यास व 1 वर्षात पंपसेट अडकल्यास पंपसेट फ्री मध्ये काढून तसेच संपूर्ण बोअरवेल साफ (फ्लशिंग) करून दिली जाईल…!💦
◾आमच्याकडे कोणत्याही कंपनीचा 4″/6″ सबमर्सिबल पंपसेट, डोमेस्टिक पंप, ओपेनवेल पंप, जुना पंपसेट योग्य दरात 2 वर्ष गॅरंटीसह नवीन पंपसेट घेऊन जा…!💦
👉( टीप:- नियम व अटी लागू)
_तसेच_
*🛑आमच्याकडून कॅमेराद्वारे अडकलेला पंपसेट किंवा बोअरवेलचा काही प्रॉब्लेम असेल तर किंवा बोअरवेलच्या पाण्याच्या पातळीची संपूर्ण पाहणी करून मिळेल. (700 फुटापर्यंत संपूर्ण बोअरवेलची पाहाणी फक्त रु. 3000 रूपयात करून देऊ…!)*
*🛑जुने बोअरवेल अडचणीच्या ठिकाणी 300 फुटापर्यंत लांब गाडी बाहेर उभी करून बोअरवेल साफ करून मिळेल व हवे असल्यास खोली वाढवून मिळेल. तसेच अडकलेला पंपसेट योग्य दरात काढून मिळेल…!*
*📱संपर्क – 👇*
*9420293799*
*7774851004*
*7768898659*
*7588570587*
*9422874647*
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

