🟥महाराष्ट्रात चतुरांच्या तीन प्रजातींची प्रथमच नोंद* *🟥आंबोली- दोडामार्ग परिसरातील जैवविविधता पुन्हा एकदा अधोरेखित: महाराष्ट्रातील चतुर किटकांची संख्या १५३ वर*……*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*
*🎴 सिंधुदुर्ग, दि२७मे.:*
महाराष्ट्रामधून इंडोलिसटस ग्रॅसिलिस डावेनपोरटी आणि डिस्फिया इथेला या टाचणी किटकांच्या दोन प्रजातींची प्रथमच नोंद करण्यात संशोधकांना यश आले आहे. या संबंधीतील संशोधनपत्र ‘जर्नल ऑफ र्थ्रेटनड टॅक्सा’ मध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या दोन्ही प्रजाती सिंधुदुर्ग जिल्ह्यात सापडल्या आहेत. प्राध्यापक डॉ. योगेश कोळी, अक्षय सुधाकर दळवी आणि राहुल ठाकुर यांच्या प्रयत्नातून हे संशोधन समोर आले आहे. भारतात इंडोलिसटस या कुळामध्ये एकुण पाच प्रजातीं सापडतात त्यापैकी इंडोलिसटस ग्रॅसिलिस डावेनपोरटी (माऊंटन रीडलिंग) ही केवळ दक्षिण भारतातुन ज्ञात होती. आणि आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चौकुळ- केगद या ठिकाणी ही प्रजात सापडल्याने महाराष्ट्रातील चतुरांच्या यादीत आणखी एका प्रजातीची भर पडली आहे. ही प्रजात आकाराने साधारणपणे त्याच्या कुळातील इतर प्रजातीं एवढीच असलीं तरी तिच्या पोटावरचा रंग, शेपटीचा विशिष्ट आकार यावरुन ही प्रजात ओळखता येते. तसेच डिस्फिया या कुळामद्धे भारतात एकून तीन प्रजाती सापडतात त्यांपैकी डिस्फिया इथेला (ब्लॅक टोरंट डार्ट) ही प्रजाती अजुनपर्यंत महाराष्ट्रातुन ज्ञात नव्हती आणि आता दोडामार्ग तालुक्यातील हेवाळे-बांबर्डे भागातुन गोळा केलेल्या नमुन्यांच्या आधारे उत्तर पश्चिम घाटातील या प्रजातीचे स्थान निश्चित झाले असुन महाराष्ट्रातील चतुरांच्या यादीत याही प्रजातींच्या समावेश झाला आहे. यासोबतच मॅक्रोडीपलॅक्स कोरा (इशुराइन स्किमर) या चतुर किटकाची देखील अतिरिक्त नोंद महाराष्ट्र राज्यातुन घेण्यात आली आहे.
डॉ. कोळी हे संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे प्राध्यापक असून गेली अनेक वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जैवविविधतेचा अभ्यास आणि संवर्धन यावर काम करत आहेत. अक्षय दळवी हे बॅ. नाथ पै ज्युनिअर कॉलेज, कुडाळ येथे सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत असून सिंधुदूर्ग जिल्ह्यातील चतुरांवर गेल्या काही वर्षांपासून अभ्यास करत आहेत. तर राहुल ठाकुर याने नुकतंच पदवी शिक्षण पुर्ण केले असुन तो दोडामार्ग-तिलारी परिसरात नेचर गाइड म्हणून काम करत आहे. शिवाय महाराष्ट्र राज्यातील एकमेव अशा मायरिस्टिका स्वॅंम या गोड्या पाण्यातील जंगलाच्या संवर्धनासाठीही तो प्रयत्नशील आहे.
सिंधुदूर्ग जिल्ह्यात आत्तापर्यंत १०० पेक्षा जास्त चतुर किटकांच्या नोंदी झाल्या आहेत. तर महाराष्ट्रात हाच आकडा १५३ वर पोहोचला असुन दरवर्षी नवनवीन संशोधन समोर येत आहे. विशेषकरून सिंधुदूर्ग जिल्ह्यातून गेल्या काही वर्षांमध्ये झालेल संशोधनं हे उल्लेखनीय आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

