🟥 कवी गोविंद काजरेकर यांच्या “सुन्नतेचे सर्ग” काव्यसंग्रहाला दुसरा पुरस्कार..
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ प्रतिनिधी:शैलेश गवस*
*🎴बांदा,दि-२७:-* गोविंद काजरेकर यांच्या सुन्नतेचे सर्ग धम्मपाल रत्नाकर राज्यस्तरीय पुरस्कार गोविंद काजरेकर यांच्या ‘सुन्नतेचे सर्ग’ या दुसऱ्या कवितासंग्रहाला दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूरचा धम्मपाल रत्नाकर हा राज्यस्तरीय पुरस्कार शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.माणिकराव साळुंखे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. गोविंद काजरेकर हे महाराष्ट्रातील एक नामवंत कवी आणि समीक्षक असून त्यांचे या आधी ‘उरल्या सुरल्या जगण्याचे रिमिक्स’ हा कवितासंग्रह तर ‘राजन गवस यांचे कथात्म साहित्य’, ‘कोकणातील कृषी संस्कृती आणि लोकगीते’,‘समकालीन कविता सांस्कृतिक परिप्रेक्ष’ इत्यादी महत्त्वाचे ग्रंथ प्रकाशित आहेत.सुन्नतेचे सर्ग या कवितासंग्रहात त्यांनी समकालीन सामाजिक जीवनातील परिवर्तनावर मार्मिक भाष्य केले आहे. सर्वसामान्य माणसांच्या समोर उभे असलेल्या प्रश्नाला त्यांनी कवितेच्या माध्यमातून वाचा फोडलेली दिसते.त्यांचे हे योगदान विचारात घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.या आधी त्यांना राजर्षी छत्रपती शाहू साहित्य गौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे.
धम्मपाल रत्नाकर साहित्य पुरस्कार वितरण करताना व्यासपीठावर प्रमुख अतिथी डॉ.माणिकराव साळुंखे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे, समीक्षक रवींद्र ठाकूर,रफिक सुरज,दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष भीमराव धुळबुळ,तसेच पत्रकार विजय चोरमारे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी दीपक बोरगावे,कविता मुरूमकर,केशव देशमुख,कविता ननावरे या मान्यवर कवीनाही पुरस्कार देण्यात आले.काजरेकर यांना मिळालेल्या सन्मानाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ बांदाचे अध्यक्ष श्री डी. बी.वारंग तसेच गोगटे वाळके महाविद्यालयाचे प्राध्यापक व कर्मचारी वर्ग आणि मित्रपरिवार यांनी अभिनंदन केले आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

