संजू परब यांचा आठवडा बाजार उभ्या बाजारात होता याचा त्यांना विसर -केसरकर
संजू परब यांचा आठवडा बाजार उभ्या बाजारात होता याचा त्यांना विसर -केसरकर
संजू परब नगराध्यक्ष असताना उभा बाजार, परिसरात आठवडा बाजार भरवला जात होता तो तलावाच्या काठी का आणण्यात आला याचे कारण समजले नाही त्यामुळे त्यांची नगरपालिकेत सत्ता आल्यास ते हा आठवडा बाजार मुळ ठिकाणी म्हणजे उभा बाजार परिसरात जाईल तो तलावाकाठी कदापी येणार नाही अशी स्पष्टोक्ती शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली.
सावंतवाडी मोती तलाव फुटपाथ हा जेष्ठ नागरिकांसाठी फेरफटका मारण्यासाठी आहे,त्यांचा हक्क आपण अबाधित ठेवलाच पाहिजे शिवाय फुटपाथवर प्लॅस्टिक च्या झोपड्या उभारुन तलावाला बकाल रुप धारण करायला कदापी देणार नाही असा इशारा शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी यावेळी बोलताना दिला..
सावंतवाडीच्या विकासात आपले योगदान असल्याने आपला तो अधिकार आहे असे केसरकर म्हणाले

