निविदा न भरणाऱ्या ठेकेदारावर कारवाई केली जाईल -केसरकर
निविदा न भरणाऱ्या ठेकेदारावर कारवाई केली जाईल -केसरकर
माझ्या मतदार संघातील अनेक विकास कामांच्या निविदा निघाल्या आहेत मात्र जाणीव पूर्वक त्या ठेकेदारांनी भरल्या नाहीत अशा ठेकेदारांनी एक लक्षात ठेवावे की जिल्ह्याबाहेरील ठेकेदार आणून ही कामे करुन घेतली जातील असा इशारा शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी ठेकेदारांना दिला आहे.
शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी दत्तक घेतलेले चौकुळ गाव,व आंबोली पर्यटन गाव याच्या दुरावस्थे बाबत विचारले असता,आंबोलीत पर्यटन स्थळांकडे जाणारे रस्ते खडीकरण व डांबरीकरण साठी निविदा निघाल्या आहेत मात्र आही ठेकेदारांनी संगनमत करून त्या निविदा भरल्या नाहीत अशा ठेकेदारांवर निश्चितच कारवाई केली जाईल असा इशारा शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी यावेळी बोलताना दिला.

