कणकवलीशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

मोडकळीस आलेल्या घरात परवानगी शिवाय वीज जोडणी दिल्याबद्दल महावितरणच्या अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी..

▪️सुहासिनी आळवे यांची कणकवली पोलीस निरीक्षकांकडे मागणी..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली,दि.२८: नगरपंचायत वार्ड नं ५ घर नं ४३८ मध्ये मोडकळीस आलेल्या मालकीच्या घरात परवानगी शिवाय वीज जोडणी दिल्याबद्दल महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी कणकवली येथील सुहासिनी केशव आळवे यांनी कणकवली पोलीस निरीक्षकांकडे केली आहे. पोलिसांकडे दिलेल्या निवेदनात आळवे यांनी म्हटले आहे, माझे मोडकळीस आलेले जुने घर आहे. त्या घराची एक खोली २५ वर्षापूर्वी भाड्याने दिलेली होती. आज ती इमारत कधीही पडेल अशी जीर्ण झालेली आहे. त्या ठिकाणी भाडेकरू हरी सुतार हे सरकारी लाइट वर आकडा टाकून चोरून वीज वापरत होते . यावेळी मी व शेजारी श्रीमती कदम यांनी सहाय्यक अभियंता व कार्यकारी अभियंता यांच्याकडे तक्रारकरून सुद्धा आजमितीपर्यंत त्याचेवर MECB अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केलेला नाही. मी सदरचे घर पाडून नवीन घर बांधणीसाठी नगरपंचायत कणकवली येथे ६ महिन्यापूर्वी अर्ज केलेला आहे. तरी काल २५ नोव्हेंबर रोजी माझ्या परवानगी शिवाय सुतार यांना वीज जोडणी देऊन  माझ्यावर अन्याय केला आहे. माझे वय वर्ष ८२ आहे . माझा मानसिक छळ भाडेकरू हरी सुतार व MECB चे  लोक मिळून करत आहेत. सदरचे बेकायदेशीर वीज कनेक्शन त्वरित काढून टाकावे. संबंधित अधिकाऱ्यांना समज देण्यात यावी अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. तसेच या संदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे ही  त्यांनी तक्रार अर्ज दिला असून,  याप्रकरणी कार्यवाही न झाल्यास उपोषणास बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. यावेळी भाजपा प्रदेश सदस्य प्रज्ञा ढवण उपस्थित होत्या.

*_💥आरोंदा पंचक्रोशीतील लोकांसाठी सुविधा..💥_*

*🔥 श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटर 🔥*

*_🔬सर्व प्रकारच्या खात्रीशीर टेस्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण.._*
💫सन 1994 पासूनची विश्वसनीय परंपरा..
💫शिरोडानंतर आरोंदा येथे दुसरी शाखा..
💫आरोंदा, गुळदुवे, नाणोस, तळवणे, भटपावणी, मळेवाड, केरी व पालये सह लगतच्या गावांतील नागरीकांची उत्तम सोय..
💫पूर्णपणे कम्प्युटराईज लॅबोरेटरी..
💫कोणत्याही आजारावर खात्रीशीर टेस्टिंग रिपोर्ट मिळण्याचा पर्याय उपलब्ध..

*_🙋🏼‍♂️आमचा पत्ता ⬇️_*
*🏬श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी*
वक्रतुंड ट्रेडर्स, अपना बाजार व मुकुंद बाजार च्या समोर, आरोंदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
*📱9422058778*
*📱7066290913*
*📱9420647895*

*_🚫टीप : लॅब दर सोमवारी बंद राहील.._*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!