रत्नागिरीराजकीय

मंडणगड शहर विकासाकरिता राष्ट्रवादी कटिबध्द; आमदार अनिकेत तटकरे

▪️पाच वर्षातील विकासकामांचे आधारे परत सत्तेत येण्याचा विश्वास..

▪️मंडणगड नगरपंचायत कार्यालय नुतनीकरण उद्घाटन प्रसंगी जाहिर सभेत प्रतिपादन..

*🖥️ Kokan Live Breaking News*

✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके

🎴चिपळूण,दि.२८: मंडणगड शहराच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कटिबध्द असुन नगरपंचायतीचे विविध  विकासकामांना खासदार सुनील तटकरे यांच्या प्रयत्नामुळे आठ दिवसांत तीन कोटी रुपयांचा निधी मंजुर झाल्याचे पत्र देणार असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेचे आमदार अनिकेत तटकरे यांनी मंडणगड येथे केले. मंडणगड नगरपंचायतीचे नूतनीकरण केलेल्या प्रशासकीय कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले  या निमीत्ताने आयोजीत स्वागत व सत्कार समारंभात ते पुढे म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मंडणगड शहराचे विकासाकरिता आग्रही असून गेल्या पाच वर्षात येथील सर्व नगरसेवकांनी अतिशय उत्तम काम केले आहे. याकामाचे आधारेचे आगामी काळातही जनता या कामाची पोहच पावती येथील नगर सेवकांना नव्याने निवडुण आणून देतील असा विश्वास व्यक्त केला. शहराचे विकासकामास विरोध करणारे कितीही झारीतले शुक्रचार्य निर्माण झाले तरी त्यांचा विरोध डावलून शहराचा पाणी प्रश्न व विकास आराखडा शहरातील नवीन बसस्थानक इत्यादी मुलभूत समस्या मार्गी लावणार असल्याचे सांगीतले. महाविकास आघाडी ही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, काँग्रेसचे प्रमुख बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे अजीत पवार यांच्या माध्यमातून काम करीत आहे व त्यांच्या विचाराने होणारा निर्णय सर्वाना मान्य करावे लागणार आहे. कमी कालावधीत मंडणगड नगरपंचायतीने मोठी भरारी घेतली आहे. यावेळी बोलताना माजी आमदार संजय कदम म्हणाले मंडणगडमधील नागरीकांनी त्यांच्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविला असून संकटाच्या काळात पळ न काढता शहर विकासास कोट्यावधी रुपयांचा निधी खेचून आणला आहे या कालावधीत अनेक आश्वासक काम केली आहे. मुख्याधिकारी नसणे व प्रशासकीय कामाचा अनुभव नसतानाही मंडणगड नगरपंचायतीने पहील्या पाच वर्षातच शहर विकास आराखड्याची पहीली पायरी मंजुर केली आहे. शहराचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी बत्तीस कोटी रुपयांचा नळपाणी योजनेचा डी.पी. आर. मंजुरीसाठी व याकरिता नागरीकांच्या हरकती मागवल्या आहेत. स्वागत समारंभास माजी आमदार संजय कदम नगराध्यक्षा आरती तलार, उपनगराध्यक्षा स्नेहल मांढरे , रमेश दळवी,भाई पोस्टुरे,प्रकाश शिगवण,सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष विरसेन मोरे, मंडणगड तालुकाध्यक्ष मुझ्झफऱ मुकदाम,युवक अध्यक्ष लुकमान चिखलकर, अनिल राटाटे,दापोली पंचायत समिती उप सभापती ममता शिंदे,पंचायत समिती सदस्य नितीन म्हामुणकर, जि.प.सदस्य प्रमोद जाधव,जि.प.सदस्या नेहा जाधव,शहर अध्यक्ष वैभव कोकाटे,फैरोज उकये, दापोली युवक अध्यक्ष विजय मुंगशे,बांधकाम सभापती दीनेश लेंडे,राहूल कोकाटे,सचिन बेर्डे,कमलेश शिगवण,शांताराम भेकत,श्रृती साळवी,नेत्रा शेरे,बेबी गोरे, प्रियांका शिगवण,वैशाली रेगे, दक्षता सापटे,मोबीन परकार,  यांच्यासह सर्व नगरसेवक, राष्टवादीचे कार्यकर्ते व शहरातील नागरीका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या निमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुका कार्यालयाचे उद्घाटन आ.अनिकेत तटकरे, माजी आमदार संजय कदम यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी मंडणगड तालुका अध्यक्ष मुझ्झ्फर मुकादम यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले.

*_🚴‍♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴‍♂️_*

*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*

          🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स

*_🌈सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚

*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com

*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*

*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!