शासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

दानोली, देवसू, ओवळीये, पारपोली येथील मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूची झाडे साफ करावी..

▪️अपघाताची जबाबदारी ठेकेदार घेईल का; संतप्त नागरिकांचा सवाल

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत

🎴सावंतवाडी,दि.२८: दानोली ते देवसू ओवळीये पारपोली येथील मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे मोठ्या प्रमाणात वाढल्याने अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. रस्त्याच्या बाजूला लावलेल्या दिशादर्शक फलक सुद्धा झाडे वाढून  वाहनचालकांना दिसत नाहीत. संबंधित शासकीय विभागाकडून कोणत्याही प्रकारची साफसफाई न झाल्याने उद्या एखादा अपघात होऊन जीवित हानी झाल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न तीनही गावातील लोक व्यक्त करत आहेत. ज्यावेळी एसटी बस गावात येते, त्यावेळी दुचाकीस्वाराला सुद्धा बाजू देताना फार मोठी कसरत करावी लागते. दानोली ते देवसू पर्यंतचा रस्ता हा ठेकेदाराच्या ताब्यात असल्याने त्याची साफसफाई करण्याचे काम ठेकेदाराचे आहे. मात्र, अद्यापही ते काम सुरू न झाल्यामुळे उद्या एखादा अपघात झाल्यास त्याची जबाबदारी ठेकेदार घेईल का असा संतप्त सवाल देवसू येथील ग्रामस्थ करत आहेत या रस्त्याने देवसू ओवळिये पारपोली या तीनही गावातील वाहतूक सुरू असते त्यामुळे लवकरात लवकर सदर रस्त्याची साफसफाई करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

*_💥आरोंदा पंचक्रोशीतील लोकांसाठी सुविधा..💥_*

*🔥 श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटर 🔥*

*_🔬सर्व प्रकारच्या खात्रीशीर टेस्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण.._*
💫सन 1994 पासूनची विश्वसनीय परंपरा..
💫शिरोडानंतर आरोंदा येथे दुसरी शाखा..
💫आरोंदा, गुळदुवे, नाणोस, तळवणे, भटपावणी, मळेवाड, केरी व पालये सह लगतच्या गावांतील नागरीकांची उत्तम सोय..
💫पूर्णपणे कम्प्युटराईज लॅबोरेटरी..
💫कोणत्याही आजारावर खात्रीशीर टेस्टिंग रिपोर्ट मिळण्याचा पर्याय उपलब्ध..

*_🙋🏼‍♂️आमचा पत्ता ⬇️_*
*🏬श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी*
वक्रतुंड ट्रेडर्स, अपना बाजार व मुकुंद बाजार च्या समोर, आरोंदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
*📱9422058778*
*📱7066290913*
*📱9420647895*

*_🚫टीप : लॅब दर सोमवारी बंद राहील.._*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!