कणकवली मधील श्री स्वयंभु मंदिर त्रिपुरारी पौर्णिमेच्या (टीपर) जत्रोस्तवासाठी सज्ज
कणकवली:२७- काही दिवसातच येत असलेल्या त्रिपुरारारी पौर्णिमेसाठी सर्व धार्मिक स्थळे व मंदिरे सज्ज झाली आहेत.यात कणकवली मधील श्री स्वयंभू रवळनाथ मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा (टिपर) मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.यावर्षीही मंदिराला भव्य अशी रोषणाई करून हा त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.कोरोना काळातील शासकीय नियमांचे पालन करून धार्मिक स्थळे सुरू झाली. त्यामुळे शासन स्तरावर सर्व नियमांचे पालन करून हा उत्सव साजरा होणार आहे. यामध्ये टिपरा दिवशी रवळनाथ मंदिरामध्ये सायंकाळी पणत्या पेटवून टीपर पाजळला जातो. नंतर मानकरी व भाविक काशीविश्वेश्वर मंदिरामध्ये पणत्या लावून रोषणाई करतात. तेथून सर्व भक्तगण श्री स्वयंभू मंदिरात येऊन मंदिरातील दीपमाळेवर पणत्या पेटवून सर्व मंदिर परिसरात प्रकाशमय करतात व सगळ्यांच्या आयुष् प्रकाशमय होऊन सर्वाना सुखी ठेवण्याची मनोमनी प्राथना करतात. अशा पद्धतीने टिपराला सुरवात होते.यावेळी मंदिरातील पालखी व तरंग घेऊन मानकरी मंदिराभोवती आरती म्हणत मंदिराला पाच प्रदक्षिणा घालतात या नंतर आलेल्या सर्व माहेरवाशिणी मंदिरात जाऊन ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरु होतो व आलेल्या भाविकांसाठी दशावतारी नाटकाचे आयोजन असते. अशी परंपरा बऱ्याच वर्षपासून श्री स्वयंभू रवळनाथ मंदिरात सुरु असल्याचे पाहायला मिळाले आहे.

