आणखीमहाराष्ट्रमुंबई

🟥 उपचारासाठी वाझे सहकार्य करत नाही! तळोजा कारागृहाची न्यायालयात तक्रार

 

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴मुंबई, दि-११:-* प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटके ठेवण्याच्या तसेच व्यावसायिक मनसुख हिरेन याच्या हत्या प्रकरणात आरोपी असलेला निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे याच्याविरोधात तळोजा कारागृहाने विशेष एनआयए न्यायालयात तक्रार केली आहे.

आजारी असलेल्या वाझेने कारागृहाच्या रुग्णालयात उपचार घेण्यास नकार दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

बायपास सर्जरी झालेल्या सचिन वाझेला तळोजा कारागृहातील उच्च सुरक्षा कक्षात ठेवण्यात आले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्याची प्रकृती अस्वस्थ आहे. त्याला उलट्या होत असून चक्करही आली. वाझेवर उपचार करण्यासाठी कारागृहातील डॉक्टरांना बोलाविण्यात आले. डॉक्टरांनी त्याला कारागृहाच्या रुग्णालयात हलविण्यास सांगितले. मात्र, वाझेने उपचार घेण्यास स्पष्टपणे नकार दिला. वाझेचा ईसीजी काढण्यात आला परंतु त्यात काहीही असामान्य आढळले नाही. परंतु खबरदारी म्हणून वाझेला कारागृहातील रुग्णालात ठेवण्याची सूचना डॉक्टरांनी केली. वाझेला मधुमेह आहे. त्यामुळे त्याला जर अस्वस्थ वाटत असेल तर त्याने रुग्णालयात उपचार घ्यावेत, असे कारागृहाने न्यायालयात केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

कदाचित बाहेरील रुग्णालयात उपचार घेण्याची संधी मिळेल, अशी वाझे याची अपेक्षा असावी. उपचार घेण्यास नकार देऊन तो कारागृहाच्या नियमांचे उल्लंघन करत असून आम्ही ते न्यायालयाच्या निदर्शनास आणू इच्छितो, असे कारागृह प्रशासनाने तक्रारीत म्हटले आहे.

 

 

वाझेच्या वकिलांनी फेटाळले आरोप

 

वाझेच्या वकिलांनी कारागृह प्रशासनाचे आरोप फेटाळून लावले आहेत. आपल्या अशिलांची रुग्णालयात नेण्यापूर्वी कोणतीही तपासणी करण्यात आली नाही.

 

सुरक्षेच्या कारणास्तव वाझेला रुग्णालयात प्रवेश देण्यात आला नाही. त्याशिवाय रुग्णालय अस्वच्छ आहे, अशी माहिती त्याच्या वकिलांनी न्यायालयाला दिली.

 

दरम्यान, एनआयएने वाझेच्या जामीन अर्जावर उत्तर देण्यासाठी आणखी एकदा वेळ मागितली. वाझेच्या वकिलांनी आक्षेप घेतला. मात्र, न्यायालयाने एनआयएला अखेरची संधी देत पुढील सुनावणी १ जूनला ठेवली.

 

 

*……………._सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!