पुणेमहाराष्ट्रराजकीय

🟥 ‘हा’ तर भाजपचा आवडता धंदा!; जयंत पाटील यांना आलेल्या ईडीच्या नोटीसवर सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया

 

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴पुणे, दि-११:-* राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आज ईडीची नोटीस आलेली आहे. त्यावर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच राज्यातील सत्तासंघर्षावर आज निकाल येणार आहे. या निकालात सर्वोच्च न्यायालय नेमकं काय म्हणतं. त्यांचा निर्णय काय असेल, याची सर्वांनाच उत्सुकता आहे. त्यावरही सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील यांना आलेल्या नोटीस संदर्भात दोन अर्थ निघतात. एकतर कर्नाटक निवडणूक झाल्यानंतर आज निकालाची वेळ ठरणं. ज्यावेळी शरद पवारांनी राजीनामा दिला होता. त्यावेळी सर्वात पहिला तीव्र आक्षेप हा जयंत पाटलांनी नोंदवला होता. जे लोक पक्ष बांधून ठेवण्याची जास्त भूमिका घेतात, अशा लोकांना त्रास देणे हा भाजपचा अत्यंत आवडता धंदा झाला आहे. ह्या ईडीच्या नोटीसकडे आम्ही फक्त सूडबुद्धीची कारवाई म्हणून पाहतो. ईडीसारखी जी स्वायत्त यंत्रणा आहे. आता भाजपच्या मर्जीत राहून काम करते. हे आता अगदी शाळकरी मुलांना देखील समजलं आहे, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.

निकाल काहीही आला तरी आम्ही त्याचं स्वागत करू. आज येणारा निकाल काय येतो हे पाहणं महत्वाचं आहे. हा एक माईलस्टोन आहे. संपूर्ण देशाच्या न्यायव्यवस्थेच्या संबंधाने अभ्यासकांच्या संबंधाने तसेच आयाराम गयाराम करत सतत सत्तेच्या खुर्चीच्या मागे धावाधाव करणारे अशा सर्वांसाठी हा निकाल एक लँडमार्क असणार आहे, असं सुषमा अंधारे म्हणाले आहेत.

 

या निकालाच्या निमित्ताने या देशात लोकशाही जिवंत आहे किंवा नाही याचा सुद्धा निकाल आज लागणार आहे. आम्ही ठरवलं आहे येणाऱ्या परिस्थितीला तोंड द्यायचं. आगामी निवडणुकांना अजून आठ-दहा महिने वेळ आहे. लोकांमध्ये जाऊन भूमिका मांडणे हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे, असंही सुषमा अंधारे म्हणाल्यात. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे. दिल्लीच्या निणर्यामध्ये केंद्र सरकारला मोठा झटका दिला आहे. दिल्लीतल्या सेवा दिल्ली राज्यसरकारच्या अधीन राहतील, असा महत्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तर महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकाल वाचनाला सुरुवात झाली आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्याकडून वाचन सुरु झालं आहे.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

 

 

 

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

 

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

 

 

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

 

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*

_सावंतवाडी_

 

*🏬Ready Possession Flat’s Available*

 

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9422054540

9422075777

 

*🏫पत्ता :-*

*Nakshtra Residency*

भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,

रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

 

*▪️ऑफिस पत्ता:-*

UG/35,Laxminakshtra Tower

Kudal, Dist. Sindhudurg

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!