🟥व्हिसेरा फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविला
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी, दि.११:* सावंतवाडी नगरपरिषदेच्या स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झालेल्या १९ वर्षीय ग्लेन जॉनी डिसोजा या युवकाचा मृत्यू नेमका कसा झाला, हे कळण्यासाठी पोलिसांनी व्हिसेरा तपासणीसाठी रत्नागिरी येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविला आहे. तेथून अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. या प्रकरणात मृत ग्लेनच्या पालकांचे जाबजबाब घेण्यात येणार आहेत. तसेच स्विमिंग पुलाचे ठेकेदार, प्रशिक्षक यांचेही जबाब घेण्यात येत आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. ग्लेन डिसोजा याच्या शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले, तरी मृत्युचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी व्हिसेरा रत्नागिरी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आल्याची माहिती तपासी अंमलदार हवालदार महेश जाधव यांनी दिली.
सामाजिक कार्यकर्ते निशांत तोरसकर यांनी स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झालेल्या ग्लेन डिसोजा याच्या मृत्यूस नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, संबंधित ठेकेदार व त्यांची टीम जबाबदार आहे. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशा मागणीचा अर्ज पोलिसांकडे दिला आहे. या अर्जाचीही चौकशी केली जाणार आहे, असे पोलिसांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आपल्या मुलाचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाला. असा प्रसंग कोणावरही येऊ नये, यासाठी या प्रकरणाची दुर्दैवी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करून न्याय मिळावा, अशी मागणी ग्लेन डिसोजा याच्या वडिलांनी केली आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

