कणकवलीराजकीयसामाजिकसिंधुदुर्ग

फोंडाघाटमधील पानबाजार आता कणकवली शहरात..

कणकवली:२७- फों​डाघाट व पान बाजार हे समीकरण वर्षानुवर्षे जुळले होते​.​ मात्र आता कणकवली शहरातही पान बाजार सुरू झाल्याने पान व्यवसायातील फोंडाघाटची मक्तेदारी मोडीत निघाली आहे.कणकवली शहरातील डीपी रोड लगत पान बाजाराचा शुभारंभ करण्यात आला असून कणकवली शहराबरोबरच तालुक्यातील ​व्यापाऱ्यांची गैरसोय दूर करण्यात येणार आहे.
कणकवली तालुक्यासह इतर पान व्यवसायिक हे फोंडा पान बाजारात पाने खरेदी करण्यासाठी जात होते.फोंडा पान बाजार हे एकमेव ठिकाण असल्याने त्या ठिकाणी अव्वाच्या स​​व्वा रुपयाने पानाच्या करंडी खरेदी कराव्या लागत होत्या.तसेच कणकवली तालुक्यातील व इतर ​व्यावसायिकांना प्रत्येक वेळी मुबलक प्रमाणात पाने उपलब्ध होत नसल्याने शहरातील पान व्यसायिकांनी पाने खरेदि करण्यासाठी फोंडा येथे न जाता शहरातच पान बाजार सुरू व्हावा यावर एकमत करत याचे पुढारपण ज्येष्ठ पान व्यावसायिक पांडू वर्दम यांनी करावे असे ठरवत यावर आज अखेर कणकवली शहरात पान बाजार सुरू करण्यात आला आहे.त्यामुळे व्यवसायिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.यावेळी शहरातील पान व्यवसायिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!