बॅ. नाथ पै सेवांगणतर्फे पारंपरिक खेळांचे आयोजन
बॅ. नाथ पै सेवांगणतर्फे पारंपरिक खेळांचे आयोजन
मालवण
बॅ. नाथ पै सेवांगण येथे पारंपरिक खेळांचे आयोजन करण्यात आले. होते. सध्या मैदानी खेळ हे मागे पडत चालले आहेत. शालेय विद्यार्थी टीव्ही, कॉम्प्युटर आणि मोबाईल मध्येच व्यस्त दिसतात. मुलांना मोबाईल गेम खेळण्याची आवड निर्माण झाली आहे.
त्यामुळे कबड्डी, खोखो तसेंच विटी दांडू लगोरी खेळले जाणारे पारंपारिक खेळ आता खेळले जात नाहीत. मैदानी खेळ हे मुलांच्या शारीरिक वाढीसाठी अत्यंत उपयुक्त
आहेत. म्हणून सेवांगणच्या वतीने पारंपरिक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पहिली ते सातवी पर्यंतचे सुमारे २०० विद्यार्थी सहभागी झाले होते. या उपक्रमास संस्थेचे अध्यक्ष देवदत्त परुळेकर सौ मंगलाताई परुळेकर संस्थेचे कार्यवाहक लक्ष्मीकांत खोबरेकर हे उपस्थित होते. हा उपक्रम यशस्वी होण्यास ज्योति तोरसकर, संजय वराडकर,पराडकर सर,काही पालक वर्ग तसेच सेवागनचे व्यवस्थापक संजय आचरेकर व सर्व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

