करुळ येथे तिघांवर मधमाश्यांचा हल्ला
करुळ येथे तिघांवर मधमाश्यांचा हल्ला
कणकवली
करुळ कदमवाडी येथे कासले कुटुंबातील तिघांवर मधमाश्यांनी हल्ला करत जखमी केले. हा प्रकार
रविवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घडला. जखमींवर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. करुळ कदमवाडी येथील आनंद
सदाशिव कासले (४२), अपूर्वा आनंद कासले (३०), ऋणाली चिंतामणी कासले (२८) यांनी घराच्या परिसरातील साफसफाई करीत कचरा गोळा केला. त्यानंतर कचऱ्याला आग लावली आणि आगीचा धूर मधमाश्यांच्या पोळ्याला लागल्याने मोहोळ उठले. माश्यांनी या तिघांवर हल्ला करीत चावा घेतला. त्यांना तात्काळ उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

