कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

बांदा शहरातील रस्त्याचे पावसाळ्यापूर्वी डांबरीकरण करा!

बांदा शहरातील रस्त्याचे पावसाळ्यापूर्वी डांबरीकरण करा!

बांदा

बांदा शहरातील मच्छीमार्केट ते मुंबई गोवा महामार्गाला जोडणारा बोगद्यातील रस्ता रहदारीच्यादृष्टीने महत्त्वाचा आहे. या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण पावसाळ्यापूर्वी करावे, अशी मागणी बांदा उपसरपंच जावेद खतीब यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल आवटी यांच्याकडे केली आहे. उपसरपंच खतीब, ग्रामपंचायत सदस्या श्रेया केसरकर, शैलेश केसरकर यांनी सावंतवाडी येथे आवटी यांची भेट घेत निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, बांदा शहराचा आठवडा बाजार
हा आळवाडी मैदानात भरविण्यात येतो. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनचालक थेट महामार्गावर जाण्यासाठी या मार्गाचा वापर करतात. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची तसेच पादचाऱ्यांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. या रस्त्याची सध्यस्थितीत दुरवस्था झाली असून वाहतुकीस धोकादायक बनला आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी तात्काळ या रस्त्याची डागडुजी करून हा रस्ता वाहतुकीसाठी निर्धोक बनवावा, अशी मागणी करण्यात आली. कार्यकारी अभियंता आवटी यांनी तात्काळ या रस्त्याची पाहणी करून पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे आश्वासन खतीब यांना दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!