कोकणसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

ओटवणे ब्राह्मण मंदिरात १० रोजी कार्यक्रम

ओटवणे ब्राह्मण मंदिरात १० रोजी कार्यक्रम

ओटवणे

ओटवणे-शेरवाळेवाडी येथील श्री ब्राह्मण मंदिर येथे बुधवारी १० मे रोजी वार्षिक उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त मंदिरात सकाळी ९ वाजता गणेश पूजन व अभिषेक, सकाळी ११ वाजता सत्यनारायण महापूजा, दुपारी १२ वाजता महाआरती व तीर्थप्रसाद, त्यानंतर महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजता स्थानिक ग्रामस्थांचे भजन, रात्री ९ वाजता शिवगणेश प्रॉडक्शन सिंधुदुर्ग (मुंबई) निर्मित आणि वसंत काणेकर लिखित, गणेश ठाकुर दिग्दर्शित ‘रायगडला जेव्हा जाग येते’ हे ऐतिहासिक नाटक होणार आहे. कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन शेरवाळेवाडी ग्रामस्थ, श्री ब्राह्मण कला क्रीडा मंडळ आणि शेरवाळेवाडी मुंबई रहिवासी विकास मंडळाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!