विलवडे देवी माऊली कलशारोहण उद्यापासून
विलवडे देवी माऊली कलशारोहण उद्यापासून
बांदा
विलवडे ग्रामदैवत श्री देवी माऊली पंचायतन मंदिरात देवता पुनःप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळ्याला ९ मेपासून प्रारंभ होत आहे. चार दिवस चालणाऱ्या या धार्मिक सोहळ्याची सांगता १२ मे रोजी होणार आहे. सलग चार दिवस भव्यदिव्य असा ‘श्री देवी माऊली पंचायतन आणि परिवार पंचकुंडी पुनःप्रतिष्ठापना यज्ञ महोत्सव’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार ९ रोजी धार्मिक कार्यक्रम, दुपारी महाप्रसाद, बुधवार, १० मे रोजी सकाळी १० वाजता मंदिर शिखरप्रतिष्ठा, देवता अधिवास, देवता स्थापना, अग्निस्थापना, ग्रहयाग, वास्तु याग, यथार्थ होम, तत्व होम, दुपारी महाप्रसाद, गुरुवार ११ मे सकाळी ८.४५ वाजता श्री देवी माऊली पंचायतनची मूर्ती बलिदान, पूर्णाहुती, महानैवेद्य, महाआरती, ब्राम्हण संभावन, तीर्थप्रसाद, महाप्रसाद, रात्री ९ वाजता आजगावकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग, शुक्रवार १२ मे रोजी सकाळी १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा, सकाळी ११ वाजता कुंकुमार्चन, आरती, नैवेद्य, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी ७ वाजता हणखणे भजन मंडळाचे भजन, रात्री ९ वाजता बाळगोपाळ नाट्यमंडळ, विलवडे यांचा नाट्यप्रयोग होणार आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन गोपाळ दळवी (कुळकर) व महादेव दळवी (स्थळकर), ग्रामस्थ व श्री देवी माऊली देवस्थान कमिटी अध्यक्ष बाळकृष्ण दळवी यांनी केले आहे.

