पाडलोस रवळनाथचा 10 रोजी वर्धापनदिन
पाडलोस रवळनाथचा 10 रोजी वर्धापनदिन
बांदा:प्रतिनिधी:शैलेश गवस
पाडलोस रवळनाथ मंदिराचा वर्धापनदिन सोहळा बुधवार दि.10 मे साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त सकाळी 7 वा. देवतांना स्थान, अभिषेक, विधीवत पूजापाठ, 10.30 वा. सत्यनारायण महापूजा व तीर्तप्रसाद, महाप्रसाद, संध्या.5 वा. स्थानिकांचे भजन,7 वा. मुंबईस्थित मालवण येथील बुवा विशाल मसुरकर यांच्या सुस्वर संगीत भजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. रात्रौ 9 वा.दत्त माऊली दशावतार नाट्यमंडळ यांचा ट्रीकसीनयुक्त ‘भेद कुष्मांडाचा महिला टेंबलाईचा’ नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे. सर्वांनी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन पाडलोस ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.

