कणकवलीमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

संत ज्ञानेश्वरांनी आध्यात्मिक लोकशाहीचे बीज रोवले!

संत ज्ञानेश्वरांनी आध्यात्मिक लोकशाहीचे बीज रोवले!

कणकवली

संत ज्ञानेश्वर महाराजांनी वाङमय निर्मितीबरोबरच आध्यात्मिक लोकशाहीचे बीज रोवण्याचा यशस्वी प्रयत्न चंद्रभागेच्या वाळवंटात केला. भागवत धर्माचा तथा वारकरी संप्रदायाचा पाया रचण्याचे अभूतपूर्व कार्य त्यांनी केले, असे प्रतिपादन कणकवलीचे तहसीलदार आर. जे. पवार यांनी केले.

आले. व्यासपीठावर शिरवल सरपंच गौरी वंजारे, उपसरपंच प्रवीण तांबे, रविकांत सावंत, पोलीस पाटील विजय शिरवलकर, ह. भ. प. विश्वनाथ महाराज गवंडळकर, रमेश सावंत, रविकांत सावंत, भिकाजी सावंत, सुनील कुडतरकर, तलाठी अर्जुन घुनावत, बैजनाथ शेलार, सदा राणे आदी उपस्थित होते.

संत ज्ञानेश्वर महाराजांनी आध्यात्माचे विचार दिले आणि चांगले संस्कार रुजविले. समाजाला एक वेगळी दिशा दिली. ते विचार पुढे नेण्याचे चांगले काम ज्ञानेश्वरी वाचनातून ह. भ. प. काशिराम फोकमारे महाराज करीत आहेत. सुसंस्कृत आणि आध्यात्मिक पिढी घडविण्याचे चांगले कार्य ते संप्रदायाच्या माध्यमातून करीत आहेत, असेही पुढे पवार म्हणाले.

शिरवल येथील विठ्ठल रखुमाई मंदिर येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि हरिनाम सप्ताह कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ह. भ. प. काशिराम फोकमारे महाराज व तहसीलदार आर. जे. पवार यांच्या हस्ते गुरुवारी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि हरिनाम सप्ताह कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यातआले. व्यासपीठावर शिरवल सरपंच गौरी वंजारे, उपसरपंच प्रवीण तांबे, रविकांत सावंत, पोलीस पाटील विजय शिरवलकर, ह. भ. प. विश्वनाथ महाराज गवंडळकर, रमेश सावंत, रविकांत सावंत, भिकाजी सावंत, सुनील कुडतरकर, तलाठी अर्जुन घुनावत, बैजनाथ शेलार, सदा राणे आदी उपस्थित होते.

संत ज्ञानेश्वर महाराजांनी आध्यात्माचे विचार दिले आणि चांगले संस्कार रुजविले. समाजाला एक वेगळी दिशा दिली. ते विचार पुढे नेण्याचे चांगले काम ज्ञानेश्वरी वाचनातून ह. भ. प. काशिराम फोकमारे महाराज करीत आहेत. सुसंस्कृत आणि आध्यात्मिक पिढी घडविण्याचे चांगले कार्य ते संप्रदायाच्या माध्यमातून करीत आहेत, असेही पुढे पवार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!