Uncategorized

सावंतवाडी सेल्फी पॉईंटचे काम पूर्ण करा!

सावंतवाडी सेल्फी पॉईंटचे काम पूर्ण करा!

सावंतवाडी

सावंतवाडी शहरातील सेल्फी पॉईंटचे काम अपूर्णावस्थेत आहे ते पूर्ण करावे. तसेच शहरात पार्किंगची व्यवस्था करावी, या मागणीचे निवेदन भाजपच्या महिला शहर मंडल अध्यक्षा मोहिनी मडगावकर व बंटी पुरोहित यांनी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांना दिले आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेत पार्किंगची जागा सुनिश्चित करावी. शहरातील मोती तलावाच्या बोट क्लबच्या कट्ट्यावरील सेल्फी पॉईंटचे काम अपूर्णावस्थेत आहे. सदर काम तातडीने पूर्ण करावे. प्रत्येक तालुक्यात तसेच काही ठिकाणी ग्रामीण ‘भागातही सेल्फी पॉईंटचे बांधकाम करण्यात आले आहे. परंतु एक वर्ष उलटले तरीही शहरातील सेल्फी पॉईंटचे काम पूर्ण करण्यात आलेले नाही. आपण याकामी लक्ष घालून सदर काम नगरपरिषदेमार्फत पूर्ण करावे मुख्य बाजारपेठेत रस्त्याच्या दोन्ही बाजूने माजी व फळविक्रेते बसून व्यवसाय करत असल्याने वाहनांच्या पार्किंगबाबत फारच गैरसोय होते. त्यामुळे नागरिकांना पोलिसांच्या दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागत आहे. याबाबत नगरपरिषदेने कारवाई करून पार्किंगची जागा सुनिश्चित करून द्यावी. तसेच अपूर्ण काम पूर्ण करावी, असे निवेदनात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!