कोकणमहाराष्ट्रसामाजिक

सातार्डा रवळनाथ पंचायतनचा आज वाढदिवस सोहळा

 

सातार्डा रवळनाथ पंचायतनचा आज वाढदिवस सोहळा

सातार्डा

सातार्डा गावचे ग्रामदैवत श्री रवळनाथ पंचायतन देवस्थानचा वाढदिवस सोहळा २ मे रोजी साजरा होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मंगळवारी सकाळी पूजा, लघुरुद्र, अभिषेक व सकाळी १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा होणार आहे. त्यानंतर भाविकांना महाप्रसाद देण्यात येणार आहे. रात्री १० वाजता श्री देव रवळनाथ नाट्यमंडळाच्यावतीने एच. के. नाईक लिखित व विजय तुळसकर दिग्ददर्शीत ‘गावदेवस्की’ हा मालवणी विनोदी दोन अंकी नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे. लाभ घेण्याचे आवाहन श्री देव रवळनाथ पंचायतन देवस्थान उपसमितीच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!