माडखोलला विकासकामाचे दोनदा भूमिपूजन
माडखोलला विकासकामाचे दोनदा भूमिपूजन
जलजीवन मिशन अंतर्गत विहीर : सत्ताधाऱ्यांतर्फे तेली यांची उपस्थिती
ओटवणे
माडखोल बामणादेवी येथे जल जीवन मिशन अंतर्गत मंजूर विहीर व पाण्याची टाकी बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन सोमवारी दुपारी सत्ताधारी गटाच्या अगोदर विरोधी गटाने एक तासापूर्वी केले. त्यापाठोपाठ सत्ताधारी गटानेही सायंकाळी या विकासकामाचे भूमिपूजन केले. त्यामुळे राजकीय चढाओढीत एकाच विकासकामाचे दोनवेळा झालेले भूमिपूजन माडखोल परिसरात चर्चेचा विषय बनला आहे.
सत्ताधारी गटातर्फे भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला. भूमिपूजन सोहळ्यात कुणाला डावलण्याचा विषयच नाही. कार्यक्रमस्थळी सर्वांचे स्वागत झाले
असते, असे सत्ताधारी गटाने स्पष्ट केले. यावेळी भाजप सावंतवाडी तालुकाध्यक्ष रवींद्र मडगावकर, सरपंच शृष्णवी राऊळ, उपसरपंच कृष्णा राऊळ, माजी सरपंच राजेंद्र राऊळ, संजय शिरसाट, शक्ती केंद्रप्रमुख दत्ताराम कोळमेकर, भाजप बुथ अध्यक्ष शैलेश राऊळ, सिद्धेश शिरसाट, आपा राऊळ, ग्रामपंचायत सदस्य अनिता राऊळ, समृद्धी शिरसाट, कैलास ठाकुर, सोमनाथ ठाकुर, प्रकाश नाईक, लक्ष्मण बरागडे, सुयोग राऊळ, दादा घाडी, पांडुरंग सावंत, पप्पू शेटकर, भरत राऊळ, जनार्दन लातये, चंद्रकांत लातये, हरेश लातये, विश्राम लातये, संजय राऊळ, प्रवीण राऊळ, प्रकाश लातये, पांडुरंग धुरी, सुयोग राऊळआदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.सत्ताधारी गटाने विश्वासात घेतले नसल्याचा आरोप करीत विरोधी गटाने नियोजित भूमिपूजन सोहळ्यापूर्वीच या विकासकामाचे जमीन मालक चंद्रकांत काशीराम लातये यांच्या हस्ते भूमिपूजन केले. तसेच विकासकामासाठी चार गुंठे जमीन दान केल्याबद्दल त्यांचा सन्मानही केला. यावेळी माजी सरपंच संजय लाड, ग्रा. पं. सदस्य संजय देसाई, विजय राऊळ, जान्हवी पाटील, सरिता राऊळ, दीप्ती राऊळ, राजकुमार राऊळ, रवी राऊळ, विशाल राऊळ, आनंद राऊळ, संतोष राऊळ, हरीश लातये, समीर राऊळ, वासुदेव होडावडेकर, सूर्यकांत राऊळ, पांडुरंग सावंत, विजय राऊळ, चंद्रकांत लातये, मनिष लातये आदी उपस्थित होते.
