आणखीमहाराष्ट्रमुंबई

🟥 मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात ; तब्बल १२ वाहने एकमेकांना धडकली

 

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴खोपोली, दि-२७:-* महाराष्ट्रातील सर्वाधिक रहदारीचा मानल्या जाणाऱ्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग तथा एक्सप्रेस हायवे हा जणू काही मृत्यूचा सापळाच ठरत आहे.कारण गेल्या काही दिवसांपासून या महामार्गावर वारंवार अपघात घडत आहेत. या महिन्यातच या महामार्गावर तीन ते चार मोठे अपघात घडले. आजसुद्धा एक भीषण अपघात घडला आहे. तब्बल १२ वाहने एकमेकांवर धडकली आहेत. यामुळे प्रचंड मोठी वाहतुकीचे कोंडी झाली.

मुंबई-पुणे महामार्गावर खोपोलीजवळ एक विचित्र अपघात घडला असून यात एकूण १२ वाहने एकमेकांना धडकली. खोपोली एक्झिटजवळ हा अपघात घडला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र या अपघातात चार महिला जखमी झाल्या असल्याचे सांगण्यात आले आहे. पुणे-मुंबई महामार्गावरील बोरघाटात गेल्या काही दिवसांत अनेक अपघातांची नोंद करण्यात आली आहे. आज देखील ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा विचित्र अपघात घडला. यामध्ये ट्रकने तब्बल १२ वाहनांना धडक दिली. परंतु या घटनेनंतर ट्रक चालक हा घटना स्थळावरून पसार झाल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक वाहन चालक नियम मोडत वाहन चालवत असल्याने या महामार्गावर अपघातात वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.

रायगड पोलिसांकडून या वाहन चालकाचा शोध घेण्यात येत आहे. बोरघाटाच्या उतारावर हा अपघात घडल्याने यामध्ये मोठ्या संख्येने वाहनांचे नुकसान झाले असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेतील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेमुळे मुंबईकडे येणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दोन दिवसांपूर्वी सुद्धा याच मार्गावर ट्रक आणि बसचा अपघात झाला होता. या अपघातात देखील चार जणांना आपला जीव गमवावा लागला होता.

दरम्यान, काल बुधवारी मुंबई-गोवा महामार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला. तर २२ प्रवासी जखमी झाले होते. त्यामुळे महाराष्ट्रातील काही महामार्ग असे आहेत ज्या ठिकाणी वारंवार अपघाताच्या घटना या घडत आहेत. ज्यामुळे महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दि. ४ एप्रिल रोजी मुंबई द्रुतगती मार्गावर कार आणि मालवाहू ट्रकचा भीषण अपघात होऊन,यात कारमधील दोघांचा मृत्यू झाला होता, तर दोन जण जखमी झाले होते. तसेच दि. ६एप्रिल रोजी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर एका ट्रकला भरधाव कारने धडक दिली. यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला होता.

 

 

*_…………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

__________________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards

▫️1BHK -14.38 Lac Onwards

▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards

▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

 

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

 

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9773815402

9773207862

9561253129

8652678734

 

*🏫पत्ता :-*

CREADAI SAWANTWADI

टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!