आणखीकणकवलीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🟥 कणकवली एसटी आगाराचे चालक रुपेश ठाकूर निलंबित..

 

*🟥 अधिकाऱ्यांना धमकी ; गाडी देण्यास उशीर झाल्याने घडला प्रकार..*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-२४:-* गाडी देण्यास उशीर होत असल्याने राज्य परिवहनच्या कणकवली आगाराचे वाहन परीक्षक यांना शिवीगाळ केली, तसेच वाहतूक निरीक्षक यांच्यासमोर अरेरावी करून धमकीची भाषा वापरून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कणकवली आगाराचे चालक रुपेश ठाकूर यांना निलंबित करण्यात आले आहे. आगार व्यवस्थापक वैभव पडोळे यांनी ही कारवाई केली.

१९ एप्रिल रोजी कणकवली बसस्थानकात रुपेश ठाकूर हे कामगिरीवर जाण्यासाठी आले. यावेळी नियोजित ड्युटीवरील वाहन परीक्षक ए. जी. कदम यास गाडी देण्यास उशीर होत असल्याने त्यांना शिवीगाळ केली. तसेच वाहतूक निरीक्षक कक्षात आले असता वाहतूक निरीक्षक परब यांच्यासमोरही अरेरावी करून अंगावर धावून गेले. परब यांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी धमकीची भाषा वापरून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. अशा परिस्थितीत रुपेश ठाकूर यांना कामावर चालू ठेवणे खात्याच्या हिताचे नसल्याने चौकशीकामी पुढील हुकूम होईपर्यंत त्यांची सेवा २१ एप्रिलपासून निलंबित करावे, असा हुकूम देत असल्याचे आगार व्यवस्थापक वैभव पडोळे यांनी निलंबन आदेशात म्हटले आहे.

 

*अहवाल घेत कारवाई*

 

पडोळे यांनी स्थानकप्रमुखांकडून प्रकरणी आगार व्यवस्थापक वैभव अहवाल घेत रुपेश ठाकूर यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. याबाबत पडोळे यांच्याशी संपर्क साधला असता कारवाई करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

 

*……………._सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!