कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

एसटीच्या ‘अमृत’ योजनेला ज्येष्ठांची मोठी पसंती !

एसटीच्या ‘अमृत’ योजनेला ज्येष्ठांची मोठी पसंती !

मार्चपर्यंत दीड लाख ज्येष्ठांचा प्रवास

कणकवली

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीतून मोफत प्रवासासाठी ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा कणकवली आगारातून मार्च महिन्यापर्यंत १ लाख ४१ हजार ६६७ ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतला आहे.

  1. एसटी महामंडळाची ‘लालपरी’ कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. एसटी प्रवास सुरक्षित असतो. त्यामुळेच ज्येष्ठ नागरिक एसटीतून आहे. प्रवासाला पसंती देतात. आता ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ योजनेंतर्गत ७५ वर्षीय ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या बसेसमध्ये मोफत प्रवास सवलत योजनेचा फायदा मिळायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे ज्येष्ठांना मोठा आधार मिळाला आहे. कणकवली आगारातून ऑगस्टमध्ये ६२०,
    सप्टेंबरमध्ये ऑक्टोबरमध्ये १२,५४०, १७,१०५, नोव्हेंबरमध्ये १९,०३८, डिसेंबरमध्ये १८,८३६, जानेवारीमध्ये २२,३५२, फेब्रुवारीमध्ये २२,७६७, मार्चमध्ये २८,४१२ एवढ्या ज्येष्ठांनी या मोफत प्रवास योजनेचा लाभ घेतला आहे.

*’महिला सन्मान’चा ८७,४४९ जणींनी घेतला लाभ!*

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने कार्यान्वित केलेल्या महिला सन्मान योजनेचा कणकवली आगारातून मार्च महिन्यात ८७ हजार ४४९ महिलांनी लाभ घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!