दाणोली येथे उद्या साटम महाराज जयंती उत्सव
दाणोली येथे उद्या साटम महाराज जयंती उत्सव
ओटवणे
कोकणातील संताचे संत शिरोमणी असलेल्या दाणोली येथील साटम महाराजांचा जयंती उत्सव शनिवार २२ एप्रिलला विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. अक्षय तृतीयेच्या सुवर्ण पर्वणीला साटम महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होते. यानिमित्त समाधी मंदिरात पहाटे ५.३० वाजता काकड आरती सकाळी ६ वाजता अभ्यंगस्नान, सकाळी ८ वाजता समाधी पूजन व सकाळी १० पाद्यपूजा, सकाळी वाजता सत्यनारायण महापूजा, दुपारी १२.३० ‘वाजता महाआरती, त्यानंतर महाप्रसाद, दुपारी २ वाजता कल्याणकर बुवा (मुंबई) यांचे कीर्तन, सायंकाळी ४ वाजता अंकुश सांगेलकर आणि सहकारी यांचे भजन, रात्री ९.३० वाजता पालखी सोहळ्यानंतर या जयंती उत्सवाची सांगता होणार आहे.

