सावंतवाडी पं.स. ला पाच संगणक, प्रिंटर
सावंतवाडी पं.स. ला पाच संगणक, प्रिंटर
सावंतवाडी
सावंतवाडी तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (वर्ग १) वासुदेव नाईक व कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या आमदार निधीमधून प्रशासनाचा कारभार प्रक्रिया जलदगतीने व्हावी, यासाठी पाच संगणक व पाच प्रिंटर सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती अशोक दळवी यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आले. यावेळी गजानन नाटेकर, पंचायत समितीचे माजी सदस्य नारायण राणे, माजी नगरसेवक तानाजी वाडकर, खेमराज ऊर्फ बाबू कुडतरकर, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी गजानन धर्णे, कृषी अधिकारी प्रशांत चव्हाण, विस्तार ‘कृषी अधिकारी गणपत लोंढे, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी सुजीत येरवलकर, अधीक्षक जितेंद्र सावंत, एकनाथ हळदणकर, पंचायत समिती कार्यालयातील सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

