व्यवसाय, कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी संपर्क साधा!
- व्यवसाय, कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी संपर्क साधा!
सिंधुदुर्गनगरी
मानव साधन विकास संस्थेचे एक अद्वितीय मॉडेल परिवर्तन केंद्राच्या माध्यमातून व व्यावसायिक सामाजिक जबाबदारी निधीतून सैनिकांची मुले, विधवा (पत्नी) यांना शैक्षणिक सहकार्य किंवा व्यवसाय, कौशल्य विकास प्रशिक्षण राबविण्याचा संस्थेचा मानस आहे. त्याकरिता सैनिक, माजी सैनिकांची मुले, विधवा पत्नी यांनी संचालक मानव साधन विकास
संस्था, नवीन प्राधिकरण (जनशिक्षण इमारत) ओरोस-सिंधुदुर्गनगरी (८७७९६८५१२०) येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. मानव साधन विकास संस्था मुंबई ही माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या संकल्पनेतून साकारलेली संस्था असून सौ. उमा प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली कोकण विभागातील सिंधुदुर्ग व रत्नागिरीत कार्यरत आहे.

