कुडाळकोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा उद्या कुडाळमध्ये मेळावा

भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा उद्या कुडाळमध्ये मेळावा

कुडाळ

कुडाळ तालुक्यातील भाजपच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा २२ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता येथील महालक्ष्मी सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा होणार आहे. प्रदेश सचिव नीलेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली, संघटन मंत्री शैलेंद्र दळवी मार्गदर्शन करणार आहेत. भाजपचे सर्व जिल्हा आणि तालुका (मंडळ) पदाधिकारी, सर्व मोर्चा आघाडी पदाधिकारी, बुथ अध्यक्ष आणि पदाधिकारी, शक्ती • केंद्रप्रमुख, शक्तीकेंद्र प्रभारी, जि. प. प्रभारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती आजी-माजी सदस्य, सरपंच/ उपसरपंच, ग्रा. पं. सदस्य, विकास संस्था चेअरमन, सहकारातील पदाधिकारी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तालुकाध्यक्ष दादा साईल यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!