इस्वटी महापुरुष मंदिर वर्धापनदिन उद्या
इस्वटी महापुरुष मंदिर वर्धापनदिन उद्या
सावंतवाडी
शहरातील सबनीसवाडा येथील ऐतिहासिक व संस्थानकालीन जागृत श्री देव इस्वटी महापुरुष मंदिराचा पहिला वर्धापनदिन शनिवार २२ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळी ६.३० ते दुपारी १ धार्मिक कार्यक्रम, दुपारी महाआरती व महाप्रसाद, सायंकाळी ७ ते ९ विविध भजन मंडळांचे भजन कार्यक्रम तर रात्री ९ वाजता इन्सुली येथील माऊली दशावतार नाट्यमंडळाचा टिकसिनयुक्त ‘माया प्रलय’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी घेण्याचे आवाहन श्री देव इस्वटी महापुरुष मंदिर समिती, सबनीसवाडा-सावंतवाडी यांनी केले आहे.
