शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आज जिल्ह्यात
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आज जिल्ह्यात
सिंधुदुर्गनगरी
शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर हे २१ एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. २१ रोजी सकाळी ९.५० वाजता चिपी विमानतळ येथे आगमन. सकाळी ९.५१ ते १०.३० वाजता चिपी विमानतळाची पाहणी. सकाळी १०.३० ते ११ वाजता चिपी विमानतळ येथे काजू फळपीक प्रकियेच्या अनुषंगाने बैठक. सकाळी ११.०५ ते ११.१५ वाजता चिपी विमानतळ येथे सिंधुरत्न समृद्ध योजनेच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक. सकाळी ११.१५ ते ११.३० वाजता चिपी विमानतळ येथे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हवाई पाहणीच्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक. सकाळी ११.३० ते ११.४० वाजता चिपी विमानतळ येथे माजगाव धरणासंदर्भात भूसंपादन व जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक. दुपारी ११.४५ वाजता खासगी हेलिकॉप्टरने तिलारीकडे प्रयाण. दुपारी १२.१५ वाजता तिलारी हेलिपॅ ड येथे आगमन. दुपारी १२.२० वाजता शासकीय मोटारीने आडाळी एमआयडीसीकडे प्रयाण व दुपारी १२.५० वाजता आडाळी एमआयडीसी येथे आगमन व पाहणी. दुपारी १.२० वाजता आडाळी येथून शासकीय मोटारीने तिलारी हेलिपॅडकडे प्रयाण. दुपारी दोन वाजता तिलारी हेलिपॅड येथून खासगी हेलिकॉप्टरने आंबोली हेलिपॅडकडे प्रयाण व दुपारी २.२० ते २.५० वाजता आंबोली येथे पाहणी. दुपारी तीन वाजता आंबोली येथून हेलिकॉप्टरने कोल्हापूरकडे प्रयाण.

