आणखीमहाराष्ट्रसामाजिक

🟥 राज्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, शेती पिकांना मोठा फटका, बळीराजा संकटात..

 

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴बुलढाणा, दि-२१ :-* हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली.वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. राज्यातील बुलढाणा, नाशिक, सोलापूर, नागपूर, बीड, नांदेड, अमरावती, सांगली, जालना या जिल्ह्यात वादळी पाऊस झाला आहे. या पावसामुळं काही ठिकाणी नागरीक जखमी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

 

बुलढाणा जिल्ह्यात वादळी पावसामुळं घरांचं नुकसान

 

गुरुवारी (21 एप्रिल) सायंकाळी बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपुर परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसानं अनेकांच्या घराचं नुकसान झालं आहे. संग्रामपूर येथील अनेक नागरिकांच्या घरावरील छपरे प्रचंड हवेमुळं उडाली आहेत. अनेकांची संसार उघड्यावर पडले आहेत. या परिसरात तीन तास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला.

 

उदयनगर परिसरात गारपीट, शेती पिकांचं मोठं नुकसान

 

चिखली तालुक्यातील उदयनगर या गाव शिवारात प्रचंड गारपीट झाली आहे. तसेच दुपारपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली होती. मात्र सायंकाळच्या सुमारास प्रचंड गारपीट झाली. त्यामुळं शेतकऱ्यांच्या शेतातील कांदा, मका आणि फळबागाचे नुकसान झाल्याची माहिती आहे. सकाळी उन्हाचा पारा वाढला होता आता हवेत गारवा निर्माण झाला आहे. या वातावरणातील बदलामुळं मानवी आरोग्यावर परिणाम होत आहे.

 

नांदेडमध्ये वादळी पाऊस

 

नांदेडमध्ये रात्री आठ वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. दिवसभर कडक उन्हाचा सामना केल्यानंतर रात्री नांदेडकरांना हवामान बदलाचा सुखद धक्का बसला. या वादळी वाऱ्याने नांदेडमध्ये घरांचं मोठं नुकसान झालं आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. या वादळी वाऱ्याने आंबा, संत्रा, मोसंबी अशा फळबागांचं नुकसान झालं आहे.

 

जालना जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

 

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यामध्ये आज पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील आलापूर, पळसखेडा, मालखेडा यासह इतर भागात

वादळी वारे आणि गारांचा पाऊस झाला. या पावसानं मका, कांदा, बाजरी यासह या भागातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे. जिल्ह्यात इतर ठिकाणी देखील तुरळक पाऊस झाला आहे. दरम्यान, गारांच्या पावसानं शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरं जाव लागतय.

 

नागपूरमध्ये एकाचा मृत्यू

 

वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने नागपूरच्या गोंडवाना चौक बहिरामजी टॉवर परिसरात भिंत कोसळल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत एक महिलेसह लहान मुलगाही जखमी झाला आहे. शहरासह जिल्ह्यातील अनेर परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.

 

बीडमध्ये विजेची तार तुटल्यानं पाच दुकानांना, लाखोंचं नुकसान

 

बीडमध्ये वादळी वाऱ्यामुळं विजेची तार तुटल्यानं पाच दुकानांना आग लागून लाखो रुपयांच नुकसान झालं आहे. शहरातील चांदणी चौक परिसरामध्ये असलेल्या एका ऑटोमोबाईल्सच्या दुकानावर विजेची तार तुटून पडल्याने ही आग लागली होती. यामध्ये ऑटोमोबाईलच्या दुकानासह ट्रान्सपोर्टच्या कंपनीच्या गोदामाच देखील प्रचंड नुकसान झाल आहे.

 

 

*……………._सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!