कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडीत १५ रोजी स्वामी समर्थ समग्र दर्शन सोहळा

सावंतवाडीत १५ रोजी स्वामी समर्थ समग्र दर्शन सोहळा

सावंतवाडी

श्री स्वामी समर्थ महाराजांच्या विविधांगी दर्शनासाठी श्री स्वामी समर्थ समग्र दर्शन सोहळा १५ एप्रिल रोजी सावंतवाडीमध्ये श्री विठ्ठल मंदिरात आयोजित करण्यात आला आहे. श्री स्वामी समर्थ गुरुरायांच्या १४ अस्सल प्रतिमा, त्यांच्या २५ चरण पादुकांचे फोटोरुपी सुस्पष्ट संपूर्ण दर्शन, त्यांच्या ३५ शिष्योत्तमांचे, श्री स्वामी स्पर्शित दुर्मीळ असंख्य वस्तूंचे, तसेच अक्कलकोटमधील श्री स्वामी लीलास्थळांचे भावस्पर्शी १२५ फोटो असे दर्शन सोहळ्याचे स्वरुप असणार आहे. श्री स्वामी वैभवाचे तसेच तळकोकणातील ठिकठिकाणच्या श्री स्वामी कार्याचेही छायाचित्ररुपी दर्शन या कार्यक्रमामध्ये होणार आहे. १५ एप्रिलला हा कार्यक्रम सकाळी ११ वाजता सुरू होणर आहे. रात्री आठ वाजेपर्यंत दर्शन सुरू राहणार आहे. १६ एप्रिलला सकाळी ९ ते रात्री ८ वाजेपर्यंत दर्शन घेता येईल. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहवे, असे आवाहन करण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!