तुम्ही गावांसाठी लढा आम्ही आपल्या सोबत आहोत,माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिला राघोजी सावंत यांना शब्द.
तुम्ही गावांसाठी लढा आम्ही आपल्या सोबत आहोत,माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिला राघोजी सावंत यांना शब्द.
बबन साळगावकर व सहकाऱ्यांनी घेतली केसरी येथे जाऊन रांगोजी सावंत यांची भेट.
केसरीतील राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी चे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आपल्या सहकाऱ्यां समवेत केसरी गावचे माजी सरपंच माजी पंचायत समिती सदस्य राघोजी सावंत यांची भेट घेऊन मी तुमच्यासोबत असल्याचा विश्वास दिला ,व कोणताही राजकीय प्रसंग अथवा कोणतीऊ घटना असो तुम्ही फक्त हाक द्या आम्ही तुमच्या सोबत उभे राहू असा विश्वास दिला.यावेळी बोलताना माजी नगराध्यक्ष बबन साळगाकर यांनी राघोजी सावंत यांना दिला.
केसरी येथील राघोजी सावंत यांच्या बाबत गेली दोन वर्ष विविध राजकीय घडामोडी घडत आहेत, त्यातून त्यांना मानसिक व शारीरिक त्रास होत असल्याने त्यांनी राजकारणापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला होता, याची माहिती माजी नगराध्यक्ष व राघोजी सावंत यांचे सहकारी बबन साळगावकर यांना मिळताच त्यांनी आपल्या सहकाऱ्यासमवेत केसरी येथे जाऊन रांगोजी सावंत यांची भेट घेतली व आपल्यासारख्या समाजसुधारकांनी अंगात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत समाजासाठी लढले पाहिजे अशी भावना व्यक्त करून आम्ही आपल्या सोबत आहोत असा विश्वास दिला.
यावेळी माजी नगरसेवक सुरेश भोगटे,माजी नगरसेवक विलास जाधव सामाजिक कार्यकर्ते उमेश खटावकर श्री नार्वेकर भिकाजी धोंड, पंकज परब,राजन सावंत,सोनू गावडे उपस्थित होते.

