कोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

कत्तलखान्यात गुरांना घेउन जाणारा आयशर टेम्पो कणकवली पोलिसांनी पकडला

कत्तलखान्यात गुरांना घेउन जाणारा आयशर टेम्पो कणकवली पोलिसांनी पकडला

टेम्पो वर छत्रपती़चे नाव व काळी कृत्ये…छावा ग्रुप च्या नावाचाही वापर

दहा गायी बैलांचे व म्हशींचे प्राण कणकवली पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचले

अमानूष पणे गुरांना आयशर टेम्पो मध्ये कोंबून कत्तलखान्यात घेऊन जात असताना कणकवली पोलिसांनी कारवाई करीत चालक आसिफ महमद इसाक सिराज वय ३५रा आजरा,गाडी मालक उस्मान उर्फ ताहीर मुनाफ जमादार वय २५नेसरी गडहिंग्लज यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करुन गुरांशा सुडकोली येथील गोशाळेत पाठविले आहे.
‌. कणकवली पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. 93/ 2023 प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 ch 11(1) (e),11(1)(f), 11(1)(h), 11(k), महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम 1995, कलम 5 (अ), 5 (ब), 9, मोटरवाहन अधिनियम 1988 कलम 66, 192अ प्रमाणे फिर्मादी मारुती बाळु बारड वय 29 वर्षे राहणार- पोलीस कॉन्स्टेबल बक्कल नंबर 1155 नेमणूक- कणकवली पोलीस ठाणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपी चालक- 1 ) आसिफ महमंद इसाक -सिराज, वय 35 वर्षे, रा. आजरा आमराई गल्ली ता. आजरा, कोल्हापुर
गाडी मालक- 2) उस्मान उर्फ ताहीर मुनाफ जमादार, वय 25 वर्षे रा. नेसरी वाडा गल्ली ता. गडहिंग्लज जि. कोल्हापुर.
क्लीनर -* 3) हुजेफा शकील सिराज वय21 वर्षे रा. आजरा आमराई गल्ली ता. आजरा, जि. कोल्हापुर | हे आपल्या ताब्यातील आयशर टेम्पो मधून दि12/04/2023 रोजी पहाटे वा. 03.27 वा. चे मानाने मौजे कुर्ले ते फोंडा चेक पोस्ट ता. कणकवली.येथे पकडला त्या टेम्पो मध्ये• मिळाला माल – 1 ) 9,00,000/- रू किंमतीचा चॉकलेटी रंगाचा आयशर कंपनीचा टेम्पो त्याच्या मागे व पुढे क्र. MH 04-FU-1979.असा नंबर आहे. समोरील शो च्या काचेवर छत्रपती असे मराठीत भगव्या रंगाने लिहिलेले आहे. टेम्पोच्या मागिल हौद्यावर हिरवट रंगाची ताडपत्री बांधलेली आहे टेम्पो जुना वापरता किं.सु.वरील टेम्पोमध्ये खालील वर्णनाची जनावरे आहेत. 01)7,000/- रू किंमतीचा काळा पांढ-या रंगाचा मागे
शिंगे वळलेला बैल किंसु.‌ 02)05,000/-रु. किंमतीचा पांढ-या रंगाचा आखुड शिंगाचा बैल किंसु.
03) 07,000/-रु. किंमतीचा पांढ-या रंगाचा उभ्या शिंगाचा बैल किं सु.0408000/- रू किंमतीचा पांढ-या रंगाचा मागे शिंगे वळलेला बैल किंसु.
05) 06,000/- रु. किंमतीची एक पांढरे रंगाची गाय तिचे उजवीकडील शिंग तुटलेली व डावे बाजुचे शिंग कानाजवळ वाकलेले आहे किं.सु
06) 06,000/-रु. किंमतीची एक पांढरे रंगाची गाय तिचे पाठीवर चॉकलेटी रंगाची चट्टे आहेत कि.सू.
07)06,000/- रु. किंमतीची एक राखाडी रंगाचे
लहान मादी जातीचे वासरु किं. सु. 08)04,000/- रु. किंमतीची एक राखाडी रंगाचे लहान मादी जातीचे वासरु किं.सु. 09)05,000/- रु. किंमतीचे लाल रंगाची लहान
उभी शिंगे असलेली गाय किं. सु.
07)06,000/- रु. किंमतीची एक राखाडी रंगाचे लहान मादी जातीचे वासरु किं. सु. 08)04,000/- रु. किंमतीची एक राखाडी रंगाचे लहान मादी जातीचे वासरु किं.सु. 09) 05,000/- रु. किंमतीचे लाल रंगाची लहान उभी शिंगे असलेली गाय किं. सु. 11)12,000/-रु. किमतीची एक काळ्या रंगाची लांब शिंगे असलेली म्हैस असुन तिचे उजवे कानात टॅग असुन त्यावरील नंबर दिसुन येत नाही 12) 25,000 /- रु. किंमतीची एक काळ्या रंगाची शिंग तुटलेले व उजवे शिंग आत वळलेले वर्णनाची म्हैस असुन तिचे डावे कानातील टॅग अर्धवट तुटलेला आहे
10)06,000/- रु. किंमतीची एक काळ्या रंगाची उभे शिंगे असलेली गाय
हकीकत- वरील तारखेस वेळी व जागी यातील आरोपीत यांनी रुपेश कांबळे रा. कोर्ले ता. कणकवली याचेकडुन जनावरे विकत घेऊन बेकायदेशिर कत्तल करण्यासाठी आयशर टेम्पों नं MH04-FU-1979 यात जनावरांच्या जिवीतास धोका निर्माण होईल अशा रितीने दाटीवाटीने कोंबुन त्यांची चा-याची व पाण्याची व्यवस्था न करता अकारण अडकवून बांधुन सदर जनावरे वाहतुकीचा परवाना नसताना कोर्ले ते फोंडा अशी वरील तारखेस वेळी व जागी वाहतुक करीत असताना मिळुन आले.म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!