‘पूर्वांचल गौरव’ या संस्थेच्या वतीने ‘ऑनलाईन छठ महापर्व’ कार्यक्रम..

▪️‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने ‘सूर्योपासने’ विषयीचे संशोधन सादर..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी,दि.२३: ‘छठ पर्व’ मूलतः ‘सूर्य षष्ठी’ व्रत असल्याने त्याला ‘छठ’ असे म्हटले जाते. ‘छठ व्रत’ म्हणजे सूर्योपासना. सूर्योपासनेमुळे व्यक्तीमधील सूक्ष्म नकारात्मक ऊर्जा न्यून (कमी) किंवा नष्ट होते, तर सकारात्मक ऊर्जा निर्माण होते किंवा वाढते, हे ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ (यू.ए.एस्.) हे वैज्ञानिक उपकरण आणि सूक्ष्म-परीक्षण यांच्या साहाय्याने केलेल्या सूर्योपासनेसंबंधी विविध प्रयोगातून स्पष्ट होते. ५००० वर्षांपूर्वी कोणतेही बाह्य, स्थूल उपकरणाचे साहाय्य न घेता आपल्या ऋषी-मुनींनी एवढी अद्वितीय उपासना पद्धती निर्माण केली. त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करायला शब्दच नाहीत’, असे प्रतिपादन महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या आधुनिक वैद्य सौ. नंदिनी सामंत यांनी केले.

त्या छठ पर्वानिमित्त ‘पूर्वांचल गौरव’ या संस्थेने १८ ते २० नोव्हेंबर या कालावधीत आयोजित ‘ऑनलाईन छठ महापर्व’ या कार्यक्रमात बोलत होत्या. या कार्यक्रमात २०नोव्हेंबर या दिवशी सूर्योपासनेविषयीचे अध्यात्मशास्त्र वैज्ञानिक भाषेत समजावून सांगण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने यासंबंधी केलेले आध्यात्मिक संशोधन सांगणारा व्हिडिओ सादर करण्यात आला. या व्हिडिओमध्ये सूर्योपासनेच्या अंतर्गत पुढील कृत्ये करणार्‍या व्यक्तींवर होणार्‍या सूक्ष्म-ऊर्जास्तरीय परिणामांचा ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे केलेला अभ्यास मांडण्यात आला.

सूर्योपासनेच्या अंतर्गत करण्यात आलेली कृत्ये

१. सूर्याला सूर्योदयाच्या आणि सूर्यास्ताच्या वेळी अर्घ्य देणे
२. गायत्रीमंत्राचा जप १०८वेळा करणे
३. सूर्याची बारा नावे न घेता सूर्यनमस्कार घालणे आणि सूर्याची बारा नावे घेत सूर्यनमस्कार घालणे

कोणत्याही उपासनेचा मूळ परिणाम सूक्ष्मस्तरावर होत असतो. हा परिणाम केवळ सूक्ष्म-परीक्षणानेच ज्ञात होऊ शकतो. यासाठी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयातील सूक्ष्मातील घडामोडींविषयी ज्ञान मिळणार्‍या आणि ते चित्राच्या रूपाने (म्हणजेच सूक्ष्म-चित्र रूपाने) मांडू शकणार्‍या संशोधन समन्वयक कु. प्रियांका लोटलीकर यांनी सूर्यपूजेच्या वेळी घडणारी सूक्ष्मातील प्रक्रिया उलगडून दाखवणारे काढलेले सूक्ष्म-चित्र सादर करण्यात आले.

*💥धमाका ऑफर.. धमाका ऑफर.. धमाका ऑफर..💥*

_🔥राऊत आणि कंपनी, रोवस्त्र, राऊत क्लाँथ सेंटर दिवाळी साठी कपड्यावर घेऊन आले आहे! खास धमाका ऑफर……!💥_

*💥😍 दिवाळी धमाका ऑफर 😍💥*

*🔥राऊत क्लाँथ सेंटर*
_ड्रेस मटेरिअल, टाँप, जिन्स_
फक्त ₹ १९९ पासून ड्रेस मटेरियल उपलब्ध..

*🔥रोवस्त्र*
_टि-शर्ट, शर्ट, जिन्स, जाँगर्स आणि हुडीस_
५० टक्के आँफ..💰

*🔥राऊत आणि कंपनी*
_साडी, सुटींग, शर्टींग_
₹ ९९ पासून साड्या उपलब्ध;
२० टक्के पर्यत सुट..💰

🏃🏻‍♂️चला तर वेळ का घालवता? आज भेट द्या! आणि लाभ घ्या! दिवाळीच्या धमाका ऑफर्स चा..🏃🏻‍♀️

*🔮 आमचा पत्ता 🤷🏻‍♂️*
*_🏬 भाट बिल्डींग, सावंतवाडी_*
*_📱संपर्क : 9156992364_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!