मालवण न.प. मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांचा कोव्हिड योद्धा म्हणून मनसेच्या वतीने सत्कार..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : मालवण

🎴मालवण दि.२३: सावंतवाडी नगर परिषदेचे मुख्याधिकारी असताना लोकाभिमुख काम करून जनतेच्या मनात अधिराज्य गाजवलेले ग़ोरगरीबा़चे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी मालवण येथे कोव्हिड वैश्विक महामारीच्या काळात आव्हानात्मक कालावधीतधीत कोव्हिड-१९ चे संक्रमण थांबववण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन करत शहरातील व शहरात येणार्‍या नागरिकांना शिस्त लावणार्‍या प्रसंगी कठोर कारवाई करणार्‍या न.प. मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांचा कोव्हिड योद्धा म्हणून मालवण तालुका मनसेच्या वतीने तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांनी शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात केला.

यावेळी श्री. जावडेकर यांनी हे यश फक्त माझे नसून न.प. कर्मचारी, अधिकारी यांनी घेतलेल्या जीवतोड मेहनतीचे हे यश आहे. म्हणुनच मी सर्व कर्मचारी वर्गाच्या वतीने हा सत्कार स्वीकारत असल्याचे संगितले. तसेच अजून धोका टाळलेला नसून सर्वांनीच योग्य खबरदारी घ्यावी व न.प. प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी तालुकाध्यक्ष विनोद सांडव, मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर, सचिव विल्सन गिरकर, गुरु तोडणकर, प्रतीक कुबल, संकेत वाईरकर, गौरव गांवकर, हरी खवणेकर, साईराज चव्हाण, अमेय सुर्वे, विवेक गाडगीळ, हितेंद्र काळसेकर आदी मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.

कोरोना जागतिक महामारीमुळे संपूर्ण जग संकटात असताना या संकटाचा सामना करण्यासाठी मालवणमध्ये डॉक्टर, आरोग्यसेवक, पोलीस, महसुल यंत्रणा, सफाई कामगार, पत्रकार हे करत असलेले कार्य निश्चितच गौरवशाली होते. याच गौरवात भर टाकण्याचे काम न.प. मुख्याधिकारी श्री.जयंत जावडेकर यांनी केले. न.प.चा अपुरा कर्मचारी वर्ग असताना समन्वय साधत शासकीय नियमांचे काटेकोर पालन करत नागरिकांना शिस्त लावण्याचे काम केले होते. आपल्या कार्यात सातत्य ठेवल्यानेच आज तब्बल पाच महिन्यांनी मालवण शहर कोरोना मुक्त झाले. सुरुवातीच्या काळात मालवण शहरात कोव्हिड रुग्ण संख्या शून्यावर होती. आताही बाहेरून येणार्‍या व मास्क न वापरणार्‍या पर्यटकांवर दंडात्मक कारवाई होत आहे. म्हणुनच नागरिकांच्या आरोग्यासाठी लढणार्‍या कर्तव्यदक्ष अधिकार्‍यांचा सत्कार आम्ही मनसेच्या वतीने केला. असे तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांनी यावेळी बोलताना संगितले.

सोशल माध्यमांमध्ये मालवण कुडाळ चे आमदार वैभव नाईक हे मालवण नगरपालिका प्रशासनाला मालवणात येणाऱ्या पर्यटकांवर जर ते विनामास्क फिरत असतील तर त्यांच्यावर कारवाई करू नका; पण मालवणातील नागरिकांवर, लोकप्रतिनिधींवर कारवाई करा अशा प्रकारचे सूचना देत असल्याचा मेसेज फिरत आहे. नियम सर्वसामान्य जनतेला एकच असेल आणि विनामास्क फिरणाऱ्या पर्यटकांवर आपण कारवाई करणार नसाल तर अशा कारवाईतून मालवण शहराबरोबरच मालवण तालुक्यातील अन्य गावातुन शहरात येणाऱ्या नागरिकांवर तसेच लोकप्रतिनीधींवर देखील अशाप्रकारे आपण कारवाई करू नये. अशाप्रकारचे निवेदन मनसेच्या वतीने मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्याकडे देण्यात आल्याचे मनसे तर्फे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

*_🔥महाबचत..😍 महाबचत..😍 महाबचत..🔥_*

आता *ऑनलाईन🌎*   पेक्षाही *स्वस्त दरात💰* सर्व *नामांकित💫* कंपन्यांचे *स्मार्टफोन📲* खरेदी करा…! *सावंतवाडीतचं🌴* आणि सोबत मिळावा *नवरात्री🛕* स्पेशल *खास🤩* भेटवस्तू….!🎁😍💃

   *📲 म्युझिक कॉर्नर 🎧*
*🎤 सावंतवाडी 🎼*

_ग्राहकांसाठी_ *नवरात्री💃, दसरा☘️* _आणि_ *दिवाळीच्या🪔* _मुहूर्तावर घेऊन आले आहेत…!_ *स्मार्टफोन📱* _तसेच_ *एलईडी टीव्ही🖥️* _खरेदीवर_ *विशेष🎊* _सूट…! सोबत_  *BAJAJ FINANCE⚡* _आणि_  *SAMSUNG✨ SURE FINANCE* _तेही_  *0%💫* _व्याजदरासह…!_🤩

*♦️आमच्या येथे उपलब्ध कंपन्यांचे स्मार्टफोन:-*
▪️SAMSUNG ▪️MI
▪️iPhone ▪️realme
▪️VIVO ▪️OPPO
▪️ONEPLUS
_तसेच_
*♦️आमच्या येथे Aiwa कंपनीच्या LED TV उपलब्ध:-*
▪️ *24″* एलईडी टीव्ही फक्त *6,500/-*
▪️ *32″* रेग्युलर  फक्त *8,990/-*
▪️ *32″* स्मार्ट फक्त *10,990/-*
▪️ *32″* अँड्रॉइड + स्मार्ट फक्त *11,990/-*
▪️ *40″* स्मार्ट फक्त *14,990/-*
▪️ *43″* स्मार्ट फक्त *18,990/-*
▪️ *50″* स्मार्ट फक्त *24,990/-*
▪️ *55″* स्मार्ट फक्त *29,990/-*
_तसेच_
*👉 सर्व कंपन्यांचे  LED टीव्ही होलसेल दरात व सुलभ हप्त्यामध्ये उपलब्ध…*
*👉 SMART TV Starts from…….Rs.10,990*

*♦️आमच्या येथे उपलब्ध कंपन्यांचे स्मार्ट टीव्ही:-*
▪️SAMSUNG ▪️MI
▪️Haier   ▪️SONY
▪️Panasonic
_तसेच_
*👉 सर्व प्रकारच्या मोबाईल अँसेसरीजवर 40% पेक्षाही जास्त भरगोस सूट…*

*🏠आमचा पत्ता :* विठ्ठल मंदिर रोड -जयप्रकाश चौक,सावंतवाडी

*📲संपर्क : 7719918722*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!