सावंतवाडी कारागृहातील बंदिवान कैदी राजेश गावकर मृत्यू प्रकरणी दोषारोपपत्र वेळेत सादर न केलेल्या पोलीस अधिकारी यांची चौकशी व्हावी.. गुरुदास गवंडे
अन्यथा म.न से चे राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली सा. उपविभागीय पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर धडक मोर्चा घेऊन येऊ.
प्रतिनिधी- प्रशांत मोरजकर
सावंतवाडी:२३ – तालुक्यातील जिल्हा कारागृह अधीक्षक योगेश पाटील यांच्यावर राजेश गावकर मृत्यूप्रकरणी सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला होता परंतु आरोपी यांनी मा जिल्हा सत्र न्यायालय सिंधुदुर्ग व मुंबई उच्च न्यायालय याठिकाणी जामीन अर्ज केला होता परंतु न्यायालय यांनी अर्ज फेटाळला याप्रकरणी सावंतवाडी पोलीस अधिकारी यांनी सदर आरोपी योगेश पाटील व त्यांचे साथीदार यांना वाचविण्यासाठी दोषारोपपत्र वेळेत सादर केले नाही व आपल्या कर्तव्यात कसूर केला व दिरंगाई केली या प्रकरणातील सर्व अधिकारी व अंमलदार यांची कसून चौकशी करून कारवाई करून बडतर्फ करावे. अशा प्रकारचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी आज उपविभागीय पोलिस अधीक्षक कार्यालयातील पोलीस निरीक्षक श्रीकांत खोत यांच्याकडे दिले.
यावेळी गवंडे यांनी या सर्व घटनेची तात्काळ दखल घ्यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेने चे राज्य सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी उपविभागीय पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर धडक मोर्चा घेऊन येऊ अशा प्रकारचा इशारा निवेदनातून दिला आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे शहराध्यक्ष आशिष, सुभेदार माजी जिल्हा उपाध्यक्ष अनिल केसरकर, तालुका सचिव विठ्ठल गावडे ,उपशहर अध्यक्ष शुभम सावंत, शहर सचिव आकाश परब, उप-विभागअध्यक्ष गौरेश गावडे आदी उपस्थित होते.

