🟥 कोलझरमधील दारूविक्री बंद न केल्यास आंदोलन ; ग्रामस्थांचा इशारा
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ प्रतिनिधी : रामचंद्र सावंत*
*🎴दोडामार्ग, दि-०८:-* अनेकांचे संसार उद्ध्वस्त करणारी कोलझर गावातील विना परवाना दारू विक्री बंद करावी अन्यथा आंदोलन करू असा इशारा तेथील ग्रामस्थांनी लेखी पत्राद्वारे येथील पोलिसांना दिला आहे. निवेदनात म्हटले आहे, कोलझर गावातील ग्रामस्थ आपणास या निवेदनाव्दारे अशी विनंती करतो की, कोलझर गावात विना परवाना दारुची बेधडक विक्री होत असून या दारुमुळे पंचक्रोशीतील अनेकांचे संसार उध्वस्त होण्याची वेळ आली आहे. तरुण दारुच्या आहारी जात आहेत. ते थांबवण्यासाठी कोलझर गावातील दारू विक्री बंद करण्यात यावी. जे दारु विक्रीचा व्यवसाय करतात त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी; अन्यथा दारु विक्री बंद व्हावी यासाठी कोलझर ग्रामस्थ आंदोलनही करू असा इशारा दिला आहे. निवेदनावर दीपक विश्वास देसाई, प्रशांत देसाई, राजेंद्र देसाई, देवू नाईक, अशोक गवस, कृष्णा नाईक, दीपक जनार्दन देसाई, मुरारी मुंगी , राजन दळवी आदींच्या सह्या आहेत.

