कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

सालईवाडा येथील राजगुरू पाणंद संरक्षक भिंत दुभाषी कुटुंबियांनी उभारली स्वखर्चाने

सालईवाडा येथील राजगुरू पाणंद संरक्षक भिंत दुभाषी कुटुंबियांनी उभारली स्वखर्चाने

सावंतवाडी-सालईवाडा  येथील राजगुरू पाणंदची संरक्षण भिंत ढासळली होती, येत्या पावसाळ्यात ती कोसळून रहिवाशांच्या जाण्याच्या मार्ग बंद झाला असता, याबाबत सदरच्या रहिवाशांनी राष्ट्रवादीशी संपर्क साधल्यानंतर राष्ट्रवादीचे पदाधिकारी काशिनाथ दुभाषीव सौ सायली दुभाषी यांनी राष्ट्रवादीच्या माध्यमातून नगरपालिकडे वारंवार पत्रव्यवहार केला मात्र नगरपालिकेने ती संरक्षण भिंत तेथील एका व्यक्तीची वैयक्तिक असल्याने त्याकडे दुर्लक्ष केले.

अखेर काशिनाथ दुभाषी व सौ सायली दुभाषी यांनी स्वखर्चातून ती संरक्षक भिंत मजबुतीकरण करून दिली, यासाठी त्यांना राष्ट्रवादीच्या कोकण विभाग अध्यक्ष सौ अर्चना घारे परब यांचे सहकार्य लाभले. या निमित्ताने आज सायली दुभाषी यांचा सालईवाडी राजगुरू पाणंदच्या रहिवाशांतर्फे सत्कार करण्यात आला यावेळी तालुका अध्यक्ष पडलिक दळवी ,शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर महिला शहर अध्यक्ष सायली दुभाषी, जिल्हा कार्याध्यक्ष उद्योग व्यापार हिदायुतुल्ला खान ,तालुका उपाध्यक्ष काशिनाथ दुभाषी ,सर्व दर्शना बाबर देसाई ,श्री देऊलकर व नाटेकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!