🟥 डिजिटल स्कूल साठी देवसू माध्यमिक विद्यालयाला सुमारे १ लाख 80 हजार चे अत्याधुनिक साहित्य प्रदान…..* *🟥 कॉर्बेट फाउंडेशन चा उपक्रम….*
_🎥 Kokan Live Breaking News_
✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत
🎴 सावंतवाडी, दि२९मार्च.:
देवसू माध्यमिक विद्यालयाला कॉर्बेट फाउंडेशन तर्फे अत्याधुनिक के-यान हे डिजिटल शिक्षण देण्यासाठीचे उपकरण प्रदान करण्यात आले. आय.आय.टी.पवई यांनी विकसित केलेल्या या उपकरणात पहिले ते दहावीपर्यंतचा संपूर्ण अभ्यासक्रम असून हे उपकरण हाताळण्यासाठी अतिशय सोपे आहे. यामध्ये प्रोजेक्टर सहित डिजिटल पेन, माऊस ,कीपॅड कंम्प्युटर असे एकाच उपकरणात देण्यात आले असून याची किंमत जवळपास १ लाख 80 हजार रुपये आहे. अशा पद्धतीची उपकरणे दिल्ली सरकारने आपल्या डिजिटल शाळांमध्ये दिलेले असून शहरांतीलअनेक इंटरनॅशनल स्कूलमध्ये अशी उपकरणे वापरली जातात. मात्र कॉर्बेट फाउंडेशनने सिंधुदुर्गातील आंबोली व दाणोली दशक्रोशीतील अति दुर्गम भागातील गावांना शैक्षणिक अतिशय उत्कृष्ट मदत केलेली असून त्याचाच एक भाग म्हणून देवसू माध्यमिक विद्यालयाला हे उपकरण प्रदान करण्यात आले. उपकरणाचा प्रदान सोहळा आज देवसू माध्यमिक विद्यालयात करण्यात आला. माध्यमिक विद्यालयासाठी कॉर्बेट फाउंडेशनने केलेल्या मदतीसाठी संस्थेच्या वतीने कॉर्बेट फाउंडेशन चे अधिकारी श्री दत्त जाधव यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. व आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कॉर्बेट फाउंडेशनचे अधिकारी श्री दत्त जाधव, साईल मॅडम व शिरसाट मॅडम, गंगोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. लवु सावंत, उपाध्यक्ष प्रमोद परब, सचिव मोहन गवस, अविनाश सावंत,देवसु सरपंच रुपेश सावंत, अशोक सावंत संतोष सावंत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. दाभोलकर मॅडम सहाय्यक शिक्षक राजाराम पाटील सर व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

