सामाजिक

पानवळ येथे “श्री रामनवमी उत्सव”होणार साजरा

 

प्रतिवर्षाप्रमाणे श्रीराम पंचायतन मंदिर,पानवळ डेगवे -बांदा येथे दि.३० मार्च या दिवशी”श्री रामनवमी उत्सव” साजरा करण्यात येणार असून.यादिवशी सकाळी ९.०० वाजता नित्यपूजन आणि अभिषेक १०.०० वा. ह.भ.प सदाशिव पाटील यांचे कीर्तन,दुपारी १२.०० वाजता रामजन्म सोहळा,तदनंतर महाप्रसाद,दु. २:०० ते दु . ३.०० वाजता भक्ती संगीत प्रदीप चिटणीस (मुंबई ),दु. ३:३० ते सायंकाळी ५:०० पर्यंत प. पू .भक्तराज महाराज भजन मंडळ पर्वरी यांचे भजन, सायंकाळी ५ . ०० ते ५:३० वाजता श्रीरामरक्षा आवर्तन,श्रीराम जप (सामुहिक )

६.०० वा.शेखर पणशीकर यांचा ” गीतरामायण ” कार्यक्रम होणार असून,रात्रौ ८.०० वाजता स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने भजन होणार आहे . समस्त भक्तांनी या कार्यक्रमाचा सर्वानी लाभ घ्यावा असे आवाहन प. पू.दास (रघुवीर ) महाराज यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!