इन्सुली गावकरवाडी येथे आज दुपारी शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीत शेतकऱ्यांचे सुमारे लाखोंचे नुकसान.
या भागात शॉर्ट सर्किट मुळे आग लागण्याची ही तिसरी वेळ.
बांदा:प्रतिनिधी:शैलेश गवस
काजु बागायतीना आग लागण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.बुधवारी दुपारी इन्सुली गावकरवाडी येथे शॉर्ट सर्किट ने लागलेल्या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले यंदा या भागात शॉर्ट सर्किट मुळे आग लागण्याची ही तिसरी वेळ आहे.दुपारच्या वेळी येथील 33 केव्ही च्या खांबावर स्पार्क झाल्याने बागायती मध्ये आग घुसली यात बागायती जळून खाक झाल्या आग लागल्यानंतर कनिष्ठ अभियंता राजेंद्र बोत्रे यांनी भेट दिली यावेळी शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
इन्सुली गावकरवाडी येथील आपट्याचे भरड येथे डोबाशेळ व गावकरवाडी येथील शेतकऱ्यांच्या काजू बागायती आहेत. नेहमीप्रमाणे बुधवारी दुपारी येथील शेतकरी नाना पाटकर हे आपले काम आटोपून एक वाजण्याच्या सुमारास घरी गेले दरम्यान दोन च्या सुमारास त्यांना तेथून जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराने तुमच्या बागायती आग लागल्याचे सांगितले त्यांनी धाव घेत आग विझविण्यासाठी प्रयत्न केला मात्र दुपारची वेळ असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले.तर त्याला लागून असलेल्या लक्ष्मण चराटकर,मंगेश चराटकर, बाबली मांजरेकर, सूर्यकांत मांजरेकर, नामदेव पालव यांच्या काजु बागायतीं माध्ये आग लागली आग विझविण्यासाठी कृष्णा पाटकर, सर्वेश मांजरेकर यांनी मदत केली
सदरच्या जागेतून माजगाव व कोलगाव येथे जाणारी 33 केव्ही ची लाइन आहेत अलीकडेच याच परिसरात स्पार्क होऊन आग लागल्याने बागायती जळून खाक झाल्या होत्या सदरच्या लाइन मध्ये बुधवारी काही तरी बिघाड होता त्याची ट्रायल घेत असताना याठिकाणी स्पार्क होऊन आग लागली असा शेतकऱ्यांचा आरोप आहे.आग लागल्या नंतर शेतकऱ्यांना याची खबर सबस्टेशनला दिली मात्र तब्बल एक तासानंतर या ठिकाणी कर्मचारी आले.त्यावेळी आग विझवीत असणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी आग विझविण्यासाठी मदत सुद्धा केली नसल्याने शेतकऱ्यांनि नाराजी व्यक्त केली.तर यावेळी कनिष्ठ अभियंता राजेंद्र बोत्रे याठिकाणी पाहण्यासाठी आले असता शेतकऱ्यांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागले.तुम्ही लाईन घेतली त्याचा मोबादला दिला नाही किमान या ठिकाणी ज्या खांबावर स्पार्क होत तो भाग तरी साफ करा जेणेकरून स्पार्क चे आगीत रूपांतर होणार नाही.यावेळी याबाबत नुकसानीचा पंचनामा करून प्रस्ताव आमच्याकडे द्या योग्य ती कार्यवाही करू असे आश्वासन बोत्रे यांनी दिले

