श्री देवी माऊली सांस्कृतिक उत्सव मंडळाचे अध्यक्ष तथा माजी सरपंच श्री प्रकाश गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर चे आयोजन
श्री देवी माऊली सांस्कृतिक उत्सव मंडळाचे अध्यक्ष तथा रोणापाल माजी सरपंच प्रकाश गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त सावित्री शंकर मंगल कार्यालय रोणापाल मडुरा तिठा येथे रविवार दि.2 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पंचक्रोशीतील नागरिकांनी रक्तदान शिबिरात सहभाग घ्यावा असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.
सांस्कृतिक मंडळातर्फे गावात अनेक विविध उपक्रम राबविण्यात येतात.गावातील रुग्णाला रक्ताची गरज भासल्यास भविष्यात मंडळातर्फे रक्त उपलब्ध होईल अन रुग्णाला योग्यवेळी रक्तपुरवठा करता येईल.या उद्देशाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंडळातर्फे देण्यात आली. तरी मडुरा पंचक्रोशीतील जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करून रुग्णांना जीवनदान द्यावे असे आवाहन माऊली सांस्कृतिक उत्सव मंडळ रोणापालचे अध्यक्ष प्रकाश गावडे यांनी केले आहे.

