वैभववाडी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सुरज कांबळे यांचा सर्व नगरसेवकांच्या वतीने सत्कार..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी,दि.२१: शहरात कोरनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिवसरात्र जबाबदारीने काम करणाऱ्या वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सुरज मधुकर कांबळे यांचा सर्व नगरसेवक यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. कोव्हीड योध्दा म्हणून त्यांना नगरसेवक व नागरिकांनी सन्मानित केले आहे.
कोरोनात आरोग्य व पोलिस प्रशासनाच्या बरोबरीने नगरपंचायत प्रशासनाने काम केले आहे. शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जीवाची पर्वा न करता मुख्याधिकारी सुरज कांबळे यांनी या महामारीत योगदान दिले आहे. सर्व सहकारी कर्मचार्यांना विश्वासात घेऊन श्री. कांबळे यांनी वैभववाडी शहरात कोरोनावर नियंत्रण मिळविले. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर त्यांनी कारवाईचा बडगा उगारला होता. शहरातील अनेक कुटुंबांना त्यांनी सँनीटायझर व मास्क वाटप केले होते. माझे कुटुंब माझी जबाबदारी हा उपक्रम शहरात त्यांनी नियोजनबद्धरीत्या राबविला. सफाई कर्मचाऱ्यांनीही त्यांच्या नेतृत्वाखाली चांगले काम केले आहे. नियोजनबद्ध केलेल्या कामामुळे शहर कोरोना मुक्त झाले आहे. जबाबदारीने काम करणाऱ्या या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचे नागरिकांमधूनही कौतुक होत आहे.
शुक्रवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत त्यांचा लोकप्रतिनिधींनी सत्कार केला. यावेळी नगराध्यक्षा समिता कुडाळकर, उपनगराध्यक्ष रोहन रावराणे, माजी नगराध्यक्ष रवींद्र रावराणे, माजी नगराध्यक्ष संजय चव्हाण, बांधकाम सभापती संतोष पवार, आरोग्य सभापती सुचित्रा कदम, महिला बाल कल्याण सभापती सुप्रिया तांबे, उपसभापती शोभा लसणे, नगरसेवक रवींद्र तांबे, संतोष माईणकर, अक्षता जैतापकर, सज्जन काका रावराणे, संजय सावंत, प्रशासकीय अधिकारी स्वाती देवकत्ते, लेखापाल महेश दळवी, लिपिक सचिन माईणकर, शांताराम पवार, शहर समन्वयक गार्गी रेगे, कर्मचारी मदा इंदप, मंगेश तांबे, सूनील निकम, स्नेहा देसाई, वृषाली गजोबार व कर्मचारी उपस्थित होते.
*💥धमाका ऑफर.. धमाका ऑफर.. धमाका ऑफर..💥*
_🔥राऊत आणि कंपनी, रोवस्त्र, राऊत क्लाँथ सेंटर दिवाळी साठी कपड्यावर घेऊन आले आहे! खास धमाका ऑफर……!💥_
*💥😍 दिवाळी धमाका ऑफर 😍💥*
*🔥राऊत क्लाँथ सेंटर*
_ड्रेस मटेरिअल, टाँप, जिन्स_
फक्त ₹ १९९ पासून ड्रेस मटेरियल उपलब्ध..
*🔥रोवस्त्र*
_टि-शर्ट, शर्ट, जिन्स, जाँगर्स आणि हुडीस_
५० टक्के आँफ..💰
*🔥राऊत आणि कंपनी*
_साडी, सुटींग, शर्टींग_
₹ ९९ पासून साड्या उपलब्ध;
२० टक्के पर्यत सुट..💰
🏃🏻♂️चला तर वेळ का घालवता? आज भेट द्या! आणि लाभ घ्या! दिवाळीच्या धमाका ऑफर्स चा..🏃🏻♀️
*🔮 आमचा पत्ता 🤷🏻♂️*
*_🏬 भाट बिल्डींग, सावंतवाडी_*
*_📱संपर्क : 9156992364_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

