वरिष्ठ वेतनश्रेणीचा निर्णय शिक्षकांच्या बाजूने
वरिष्ठ वेतनश्रेणीचा निर्णय शिक्षकांच्या बाजूने
त्रुटी दूर करण्याचे, वेतन वसूल न करण्याचे न्यायालयाचे आदेश
ओरोस
वरिष्ठ वेतनश्रेणीतील शासनाच्या त्रुटींबाबतच्या न्यायालयीन लढाईत शिक्षकांना यश आले आहे. प्राथमिक शिक्षकांच्या वरिष्ठ वेतनश्रेणीतील त्रुटी दूर कराव्यात. तोपर्यंत जास्तीचे देण्यात आलेले वेतन वसूल करण्यात येऊ नये, असे आदेश औरंगाबाद उच्च न्यायालय खंडपीठाने सरकारला दिले आहेत.
सातव्या वेतन आयोगात प्राथमिक शिक्षकांच्या वरिष्ठ वेतनश्रेणीबाबत त्रुटी निर्माण झाल्या होत्या. याचा फटका बसलेल्या राज्यातील अनेक शिक्षकांनी उच्च न्यायालयाच्या मुंबई, औरंगाबाद व नागपूर खंडपीठात सुमारे चार हजारहून अधिक जिल्हावार याचिका दाखल केल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६६ शिक्षकांचा यामध्ये समावेश आहे.
यापैकी औरंगाबाद उच्च न्यायालयात दाखल याचिका क्र. १३०३१/२०२२,
१३०३२ / २०२२, ११५१८/२०२२ ११५१९/२०२२, १७३५/२०२३, १३०३३/२०२२, १०४९५/२०२२, काढल्या. १०४९६/२०२२, १०४९७/२०२२, १०४९८/२०२२ यांची एकत्रित सुनावणी घेण्यात आली. १० फेब्रुवारी २०२३ च्या सुनावणीत जून २०२३ पर्यंत शासनाने वरिष्ठ वेतनश्रेणीबाबतच्या त्रुटी दूर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच तोपर्यंत जादाचे अदा झालेले वेतन वसुली करण्यात येऊ नये, असेही अंतिम निर्णयात सांगितले आहे.’
या संदर्भातील सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, नाशिक आणि ठाणे जिल्ह्यातून मुंबई उच्च न्यायालयात आले. दाखल असलेल्या याचिकांवर ८ मार्च २०२३ रोजी सुनावणी घेण्यात आली. औरंगाबाद (संभाजीनगर) च्या १० फेब्रुवारीचा निकाल मुंबईच्या सर्व प्रकरणांमध्ये लागू करून त्रुटी निवारण करण्याचा निर्णय शासनाने आणि त्रुटी निवारण समितीने ३० होते. जून २०२३ पर्यंत घेण्याचे आदेश देत न्यायालयाने याचिका निकाली अॅड. बालाजी शिंदे यांच्या अथक प्रयत्नातून महाराष्ट्रातील हजारो शिक्षक कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला असल्याची माहिती शिक्षक नेते चंद्रकांत अणावकर यांनी दिली. अन्यायग्रस्त शिक्षकांना न्याय मिळाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीतर्फे त्यांचे आभार मानण्यात आले. सिंधुदुर्गातील ६६ याचिकाकर्त्यांच्या विश्वासानेच हा लढा आज जिंकता आला, असेही स्पष्ट करण्यात यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सरचिटणीस राजन कोरगावकर, दादा जांभवडेकर, चंद्रकांत अणावकर, संतोष वारंग, नारायण नाईक, सचिन मदने, नंदू राणे, प्रसाद वारंग आदी उपस्थित होते.

