कुडाळला आज स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
कुडाळला आज स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
कुडाळ
सरकारी खात्यातील विविध भरतीच्या पार्श्वभूमीवर युनिक अॅकॅडमी (सिंधुदुर्ग) व संत राऊळ महाराज महाविद्यालय (कुडाळ) यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ११ मार्चला दुपारी १ ते ३ या वेळेत कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयात आयोजित करण्यात आले आहे. सरकारी खात्यातील जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी, मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी, तलाठी या पोस्ट यूपीएससी, एमपीएससी, क्लास वन, क्लास टू क्लास थ्री, नगरपालिका, वन, आरोग्य, कृषी, लिपीक, सरळसेवा या स्पर्धा परीक्षांतून भरल्या जातात. यासाठीच हे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आहे. मार्गदर्शक म्हणून कुडाळचे तहसीलदार अमोल पाठक, युनिक अॅकॅडमीचे संचालक सचिन कोर्लेकर उपस्थित राहणार आहेत. अधिक माहितीसाठी मोबा-९९६०६५८४५८ येथे संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

